Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 18 May 2025
webdunia

हिवाळ्यात गरम सुपाचे सेवन करा आणि 10 फायदे मिळवा

benefites of drink hot soup
, गुरूवार, 21 जानेवारी 2021 (20:52 IST)
हिवाळ्याच्या हंगामात गरम सुपाचे सेवन केल्यानं आपल्याला उबदारपणा जाणवेलच तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासह निरोगी ठेवेल. 
 
लोक सामान्यत: आजारी असताना सुपाचे सेवन करतात पण सूप आपल्या दैनंदिनीत समाविष्ट करण्याचे अनेक फायदे आहे. चला तर मग सुपाचे गुणधर्म जाणून घेऊ या.
 
1 सर्दी-पडसं - थंडी आणि सर्दी पासून वाचण्यासाठी गरमसूप प्रभावी आहे. या शिवाय सर्दी किंवा घसा खवखवत असल्यास काळीमिरी घालून सूप प्यायल्यानं लवकर आराम मिळतो.
 
2 अशक्तपणा दूर करत - शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर सुपाचे सेवन करणे फायदेशीर आहे. हे अशक्तपणा दूर करून प्रतिकारक शक्ती अधिक बळकट करते. हे ताप,शारीरिक वेदना,सर्दी-पडसं सारख्या समस्यांशी लढण्यासाठी मदत करतं.या शिवाय तब्येत खराब झाल्यावर सुपाचं सेवन केल्याने कोणतेही  त्रास होत नाही.
 
3 पचनास सुलभ -सुपाचं सेवन आजारपणात या साठी करतात की हे सहजपणे पचतं आणि या मुळे कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवतं नाही आणि आजारानंतर शिथिल झालेले पचन तंत्र देखील पद्धतशीर काम करतं.
 
4 चव वाढवते- जर आपल्या तोंडाची चव बदलत आहे, आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट चवीची वाटत नसेल, तर चव चांगली करण्यासाठी सूप प्यावं. या मुळे चव वाढविण्यात मदत मिळेल.
 
5 ऊर्जेसाठी - शारीरिक दुर्बलता असल्यास सुपाचे सेवन केल्यानं ऊर्जा मिळते आणि आपण पूर्वीपेक्षा अधिक स्वस्थ अनुभवता. हळू-हळू आपल्या ऊर्जेची पातळी वाढते. या मुळे आपण निरोगी आणि सुदृढ बनता. 
 
6 हायड्रेशन -जेव्हा आपण अस्वस्थ असता किंवा तापाच्या दरम्यान शरीर डिहायड्रेट होत. म्हणून अशा वेळी शरीराला हायड्रेट करण्यासाठी सुपाचे सेवन केले पाहिजे. या मुळे शरीरात पाण्याचे प्रमाण आणि पोषकद्रव्ये दोन्ही प्रवेश करतात.      
 
7 श्लेष्मा पातळ करतो- दुर्बलतेमुळे श्लेष्मा घट्ट होतो, या मुळे बॅक्टेरिया आणि विषाणूचा धोका वाढतो. सुपाचे दररोज सेवन केल्याने श्लेष्मा पातळ होतो जेणे करून कोणताही संसर्ग होत नाही.
 
8 वजन कमी करतं - जर आपण कमी प्रमाणात कॅलरी घेणं पसंत करता आणि वजन लवकर कमी करू इच्छिता, तर सुपापेक्षा अधिक चांगले काय असेल. या मध्ये फायबर्स आणि पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. कॅलरी देखील जास्त नसते. सूप प्यायल्याने लवकर पोट भरतं जडपणा जाणवत नाही.
 
9 पौष्टिक - सूप कोणतेही असो, पौष्टिक घटकांनी समृद्ध असतं. ज्या भाज्यांचे किंवा इतर खाद्य पदार्थांचे सूप बनत त्या पदार्थाचे संपूर्ण तत्त्व सुपात असतं. या शिवाय विविध पोषक घटकांनी समृद्ध असलेलं सूप आंतरिक शक्ती देण्याचे काम करतं.
 
10 भूक वाढणे - जर आपल्याला भूक लागतं नाही किंवा कमी लागते, तर सूप पिणं चांगला पर्याय आहे. कारण सूप प्यायल्यानं हळू-हळू भूक वाढते आणि अन्नाबद्दलची आवड देखील वाढते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय सांगता, मायग्रेन च्या समस्ये मध्ये सोयाबीन फायदेशीर आहे