Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

या 6 ड्रिंक्सच्या मदतीने नवरात्रीमध्ये एनर्जी लेव्हल राहील उत्तम

या 6 ड्रिंक्सच्या मदतीने नवरात्रीमध्ये एनर्जी लेव्हल राहील उत्तम
नवरात्रीत उपास करत असाल किंवा नऊ दिवस देवीची आराधना म्हणून गरबा खेळत असाल तर आपल्याला शरीराला नक्कीच अधिक एनर्जीची गरज भासेल. अशात स्टॅमिना कायम ठेवण्यासाठी गरज आहे अश्या ड्रिंक्सची ज्याचे सेवन करू आपण ताजेतवाने राहाल.
 
नारळ पाणी
यात पाच महत्त्वाचे पौष्टिक तत्त्व आढळतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, पोटॅशियम आणि सोडियम. या व्यतिरिक्त हे अँटिऑक्सिडेंटने भरपूर असतं ज्याने चेहर्‍याची चमक वाढते.
 
लिंबू शिकंजी
लिंबाचं शरबत केवळ उन्हाळ्यासाठी नव्हे तर जेव्हाही एनर्जीची गरज भासेल तेव्हा पिणे योग्य ठरतं.‍ लिंबात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि घुलनशील ग्लुकोज आढळतं. रक्तात शिरून हे शरीराला हायड्रेट करून मिनरल्सची पूर्ती करतं.
 
बनाना शेक
केळी तुरंत ऊर्जा प्रदान करणारे फळ आहे म्हणून आपण बनाना शेक पिऊ शकता. यात आढळणारे ग्लुकोज, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पोटेशियम आणि फास्फोरस मिळून आपला थकवा दूर करून एनर्जी लेव्हल वाढवण्यात मदत करतं.
 
बीट ज्यूस
कार्बोहाइड्रेटने भरपूर या ज्यूसने लगेच ऊर्जा मिळते. सकाळी याचे सेवन आपल्याला दिवसभराची ऊर्जा प्रदान करण्यात मदत करेल.
 
अॅप्पल ज्यूस
अॅप्पल अधिक वेळेपर्यंत शरीराला ऊर्जावान ठेवण्यात मदतगार ठरतं. म्हणून दुधासोबत अॅप्पल शेक तयार करून पिणे योग्य ठरेल.
 
कॅरट ज्यूस
व्हिटॅमिन, मिनरल्स, प्रोटीन आणि कॅरोटिनने भरपूर कॅरेट ज्यूस आपल्याला ऊर्जावान ठेवतं. याने कॅलरीज घटण्यात मदत मिळते आणि पोषक त्त्वांचे प्रमाण वाढतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नको त्या अपेक्षा, स्व कर्तुत्वावर विश्वास ठेवा