हिवाळयात फ्लू किंवा संसर्ग पसरणे ही सामान्य बाब आहे, जर आपली रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास, कदाचित ती व्यक्ती आजारी पडणार नाही किंवा तो लवकर बरा होईल. या वेळी कोरोना विषाणू सारखा प्राणघातक रोग पसरला आहे, अश्या मध्ये अधिक सावध आणि जागरूक राहण्याची आणि आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याची गरज आहे.
तसं तर प्रत्येक हंगामांत फळांचे सेवन केले पाहिजे, पण काही असे फळ आहे जी हिवाळ्यात प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करतात. ते सर्दी पडसं पासून कोरोनाविषाणू पर्यंत आपले संरक्षण करतील.
चला जाणून घेऊ या हिवाळ्यात कोणत्या फळाचे सेवन करावं. जे आपल्या प्रतिकारक शक्तीस वाढविण्यास उपयुक्त आहे.
1 पेरू -
जरी पेरू हा भारतात आढळणारा सामान्य फळ आहे, तरी याचे फायदे बरेच आहेत. याचा औषधी गुणधर्मामुळे याला 'अमृतफळ' असे ही म्हणतात. वास्तविक, पेरू व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सीडेन्ट सह समृद्ध आहे, जे रोगापासून आपला बचाव करते आणि संसर्गाला दूर करते. या मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे रक्तातील साखर आणि हृदयासाठी फायदेशीर मानले जाते.
2 नाशपती -
पेरू सारखे नाशपती देखील व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंटने समृद्ध असतं, या मुळेरोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. सामान्य सर्दी, ताप किंवा इतर सौम्य आजारात खाण्याच्या सल्ला दिला जातो. याचा सेवनाने हृदय रोग कमी करण्यास देखील मदत होते.
3 संत्र -
संत्र हे पोषक घटकांनी समृद्ध असतात. म्हणून हिवाळ्याच्या हंगामात तज्ज्ञांनी प्रत्येकास याचा सेवनाचा सल्ला दिला आहे. संत्रे हे व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात, जे आपल्या प्रतिकारक शक्तीला वाढविण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी आवश्यक असतं. दररोज संत्र्याचा रस पिणे देखील फायदेशीर असतं.
4 मोसंबी -
मोसंबी रोग प्रतिकारक शक्ती बळकट करते, कारण ही व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सीडेन्ट ने समृद्ध असते. याचा दर रोजच्या सेवन केल्यानं सर्दी- पडसं सारख्या त्रासातून आराम तर मिळेलच, या शिवाय बॅक्टेरिया आणि विषाणूंविरूद्ध लढायला देखील मदत होते.
5 आलू बुखारा -
आलू बुखारा ज्याला प्लम म्हणून ओळखतात या मध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक आढळतात. या मध्ये व्हिटॅमिन ए, सी, के आणि भरपूर प्रमाणात फायबर आढळतं. या शिवाय या मध्ये अँटी ऑक्सिडंट देखील असतात. याचा सेवनाने प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत तर मिळतेच, तर शरीर बळकट आणि ताकतवर बनतंं.