तसं तर लसूण खाणे आरोग्यदृष्ट्या अत्यंत फायद्याचं असतं. परंतू आपल्याला या 5 पैकी एक देखील समस्या असेल तर लसूण खाणे टाळणे योग्य ठरेल:
1 अॅसिडिटी, हार्टबर्न, पोटातील अल्सर आणि अतिसार सारखे आजार असणार्यांनी लसूण खाणे टाळावे.
2 ऍनिमियाच्या रुग्णांसाठी देखील लसणाचे सेवन हानिकारक ठरू शकतं. अशात लसणाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन कमी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं.
3 आपल्याला कमी रक्तदाब अर्थात लो ब्लड प्रेशरची समस्या असेल तर लसूण खाऊ नये. लसूण रक्तदाब कमी करतं म्हणून हाय ब्लडप्रेशर असणार्या लोकांना लसूण वापरण्याचा सल्ला दिला जातो.
4 गर्भावस्थेत अती प्रमाणात लसूण खाणे हानिकारक ठरू शकतं. लसणाची प्रकृती उष्ण असल्यामुळे गर्भस्थ शिशूसाठी हे धोकादायक ठरू शकतं.
5 आपण ऑपरेशन किंवा सर्जरी करण्याच्या तयारीत असाल तर लसणाचे सेवन आपल्यासाठी समस्या उद्भवू शकतं. हे रक्त पातळ करतं अशात सर्जरी दरम्यान अधिक ब्लीडिंग होण्याची शक्यता वाढू शकते.