Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अलर्ट ! शरीराच्या या अवयवांमध्ये वेदनेसाठी स्मार्टफोन कारणीभूत

अलर्ट ! शरीराच्या या अवयवांमध्ये वेदनेसाठी स्मार्टफोन कारणीभूत
स्मार्टफोन हातात नसला की काही तरी चुकतं अशीच भावना येत राहते. परंतू सतत स्मार्टफोन हातात ठेवणार्‍यांनी किंवा वापरणार्‍यांनी यामुळे शरीरावर होत असलेले परिणाम देखील जाणून घेतले पाहिजे. तर जाणून घ्या स्मार्टफोन वापरल्याने शरीराचे कोणते अवयव आपल्याला वेदना पोहचवू शकतात:
 
1 बोटांमध्ये वेदना - सतत मोबाइल वापरल्याने बोटांना वेदना जाणवू शकतात. याने बोट दुखणे, बोटात ताणल पेटके येणे अशी समस्या उद्भवू शकते.
 
2 मानेत वेदना - फोन वापरताना आपल्या मानेत वेदना होणे अगदी साहजिक आहे. खूप वेळ मानेवर जोर देणे किंवा एकाच अवस्थेत राहणे हानिकारक ठरु शकतं.
 
3 डोळ्यात वेदना - खूप काळ फोन वापरल्याने डोळ्यात वेदना, जळजळ आणि होळ्यासंबंधी इतर आजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याने डोळ्याती कोरडेपणा देखील वाढू शकतो.
 
4 पाठ दुखी - सतत बसून स्मार्टफोन वापरल्याने पाठ दुखणे सुरु होऊ शकतं. यापासून वाचण्यासाठी सक्रिय राहणे गरजेचे आहे.
 
5 खांदे दुखणे - हातात फोन धरुन आपण खूप-खूप वेळ फोन वापरत असता, अशात खांद्यामध्ये ताण निर्माण होऊ शकतो आणि यामुळे वदेना सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोनोक्रोम ड्रेस कसे परिधान करावे?