Festival Posters

गर्भावस्थात कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करणे योग्य कि अयोग्य ?

Webdunia
शनिवार, 21 मार्च 2026 (22:30 IST)
कोल्ड ड्रिंक्स पिणे प्रत्येकाला आवडते. अनेकांना दररोज कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सवय असते. गर्भधारणा ही अशी स्थिती आहे जेव्हा स्त्रीला आवश्यकतेपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. असे म्हटले जाते की गर्भधारणेदरम्यान स्त्रीने दोन वेळ खावे. तथापि, या काळात विविध प्रकारच्या अन्नाची लालसा असणे स्वाभाविक आहे. गरोदरपणात महिलांना अनेकदा अनेक विचित्र इच्छा असतात.
ALSO READ: शरीरात कमजोरी जाणवते? खा हे 7 एनर्जी फूड्स
काही स्त्रिया गरोदरपणात सोडा आणि कोल्ड्रिंक्सचे सेवन करतात.पण गरोदरकाळात महिलांनी कोल्ड ड्रिंक्स पिऊ नये. कोल्ड ड्रिंक्स मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असतात. त्यामुळे गरोदरपणात कोल्ड ड्रिंक्सचे सेवन बाळासाठी धोकादायक असते. कोल्ड ड्रिंक्स मुळे महिलेचा गर्भपातही होऊ शकतो.कोल्ड ड्रिंक पिण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.
ALSO READ: अचानक बदललेल्या हवामानात आजार टाळण्यासाठी करा हे 5 उपाय

साखरेचे प्रमाण वाढते-

कोल्ड ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे गरोदरपणात त्यांचे सेवन करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. गर्भधारणेदरम्यान कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्याने महिलेला साखरेचा त्रास होऊ शकतो. एवढेच नाही तर त्यामुळे महिलेचा गर्भपातही होऊ शकतो.  
ALSO READ: डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

हाडांसाठी हानिकारक- 

गर्भधारणेदरम्यान कोल्ड्रिंक्सचे सेवन करणे देखील हानिकारक मानले जाते कारण यामुळे गरोदर स्त्रीच्या हाडांना नुकसान होऊ शकते. वास्तविक, कोल्ड्रिंक्समध्ये फॉस्फोरिक ऍसिड आढळते जे हाडांसाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे जन्मलेल्या मुलाची हाडेही कमकुवत होऊ शकतात.  
 

 पोषक तत्वांचा अभाव- 

या अवस्थेत महिलांनी आहारात पौष्टिक तत्वांचा समावेश करावा. सकस आणि पौष्टीक अन्न खावे. ज्यामुळे त्यांना सर्व पोषक तत्व मिळतील. आणि बाळाची वाढ चांगली होईल. महिलांनी या काळात कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करू नये. या मध्ये कोणतेही पोषक तत्व नसतात. हे पेय घेऊन शरीराला कोणताही फायदा होत नाही. या काळात नारळ पाणी, फळांचे रस, लिंबू पाणीचे सेवन करावे. ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 
 

कॅफीनचे प्रमाण जास्त असते- 

या मध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असते. याचा अतिसेवनाने  आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे महिलांमध्ये निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. तसेच पाण्याची कमतरता होऊ शकते. 
 

मुलांच्या वाढीसाठी हानिकारक- 

या अवस्थेत कोल्डड्रिंक्सचे सेवन केल्याने बाळाची वाढ कमी होते. मेंदूला हानी होते. गर्भावस्थेत सोडाचे सेवन केल्याने पोटातील बाळाची वाढी वर परिणाम होतो. बाळाचा शारीरिक व मानसिक विकास व्यवस्थित होत नाही. 

अस्वीकरण: वेबदुनियावर औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष, इतिहास, पौराणिक कथा इत्यादी विषयांवर प्रकाशित/प्रसारित होणारे व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत आणि विविध स्त्रोतांकडून घेतल्या आहेत. वेबदुनिया याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. आरोग्य किंवा ज्योतिषाशी संबंधित कोणताही प्रयोग करण्यापूर्वी नेहमीच तज्ञांचा सल्ला घ्या. ही सामग्री सार्वजनिक हितासाठी सादर केली गेली आहे आणि कोणत्याही वैज्ञानिक पुराव्यांद्वारे समर्थित नाही.
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

नवीन

सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय; चीज स्वीट कॉर्न सँडविच

पावसाळ्यात लहान मुलांना आजारपणापासून वाचवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Career Tips: डिप्लोमा इन पॉलिटेक्निक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये करा करिअरची दमदार सुरुवात

आठवड्यातून फक्त दोनदा मुलतानी माती लावण्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments