Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रत्येक संसर्गापासून वाचवतं हळदीचं दूध 11 फायदे जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 24 मे 2021 (19:39 IST)
आजकाल हळदीच्या दुधाबद्दल म्हणजेच गोल्डन मिल्क बद्दल बरीच चर्चा आहे. सर्वसाधारणपणे हळदीचे दूध सर्दी झाल्यावर किंवा शारीरिक वेदना असल्यास घरगुती उपचार म्हणून वापरले जाते. परंतु माहिती आहे का की हळदीच्या दुधाचे बरेच फायदे आहेत? जर हे  माहित नसेल तर आम्ही सांगत आहोत-
 
हळद ही अँटिसेप्टिक आणि अँटिबायोटिक गुणधर्मासाठी ओळखली जाते आणि दूध आणि कॅल्शियमचा स्त्रोत असल्याने शरीर आणि मेंदू साठी अमृतसारखेच आहे.जेव्हा दोघांचे गुण मिसळले जातात, तेव्हा हे संयोजन आणखी चांगले सिद्ध होते, कसे ते जाणून घ्या -
 
1 जेव्हा एखादी जखम झाल्यास  - जर एखाद्या कारणास्तव शरीराच्या बाहेरील किंवा आतील भागास दुखापतnझाली असेल तर, हळदीचे  दूध शक्य तितक्या लवकर दुखापत बरे करण्यात खूप फायदेशीर आहे. कारण हे अँटी बॅक्टेरिया आणि एंटीसेप्टिक गुणधर्मांमुळे बॅक्टेरिया वाढू देत नाही.
 
2 शारीरिक वेदना- हळदीच्या दुधामुळे शरीराच्या वेदनेत आराम मिळतो. जर आपल्याला हात, पाय आणि शरीराच्याइतर भागांमध्ये वेदना होत असेल तर रात्री झोपायच्या पूर्वी  हळदीचे दूध प्यावे.
 
3 त्वचा स्वच्छ आणि सुंदर होते-दूध प्यायल्यामुळे त्वचेत एक नैसर्गिक चमक निर्माण होते आणि दुधासह हळदीचे सेवन अँटिसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल असल्याने हळूहळू त्वचेच्या संसर्ग, खाज सुटणे, मुरुम इत्यादींचा नायनाट करते. या मुळे आपली त्वचा स्वच्छ ,निरोगी आणि चमकदार बनवते.
 
 
4 सर्दी झाले असल्यास -सर्दी पडसं झाले असल्यास किंवा कफ झाले असल्यास हळदीच्या दुधाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामुळे सर्दी-पडसं बरे होते, तसेच गरम दुधाचे सेवन केल्याने फुफ्फुसात जमा होणारा कफ देखील दूर होतो. हिवाळ्याच्या काळात त्याचे सेवन केल्याने आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते.
 
5 हाडे मजबूत होतात- दुधात कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होतात. हळदचे गुणधर्म प्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे हाडांशी संबंधित इतर समस्यांपासून मुक्तता होते आणि ऑस्टिओपोरोसिस कमी होतो.
 
6 झोप येत नसल्यास- कोणत्याही कारणास्तव झोप येत नसल्यास तर 
या वर सर्वात चांगले घरगुती उपाय हळदीचे दूध घेणे आहे.रात्री जेवणानंतर झोपेच्या अर्धा तासाच्या आधी हळद असलेले दूध प्या आणि आश्चर्यकारक परिणाम बघा. 
 
7 पाचक प्रणाली गडबड असल्यास- हळदीच्या दुधाचे सेवन आतड्यांना निरोगी ठेवून पाचन समस्या दूर होतात. पोटाचा अल्सर, अतिसार, अपचन, कोलायटिस आणि मूळव्याधासारख्या समस्यांमध्ये हळदीचे दूध देखील फायदेशीर आहे.
 
8 सांधेदुखीमध्ये प्रभावी - हळदीच्या दुधाचे दररोज सेवन केल्याने सांध्यातील ताठरपणा दूर होतो तसेच सांध्यांचे स्नायू लवचिक होतात.
 
9 रक्तातील साखर कमी करतो - रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यास हळदयुक्त दुधाचे सेवन केल्याने रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर जास्त प्रमाणात कमी होते, हे लक्षात ठेवा.
 
10 श्वासाचा त्रास होणे- हळदीच्या दुधामध्ये असलेले अँटी मायक्रोबियल गुणधर्म दमा, ब्राँकायटिस, सायनस, फुफ्फुसातील दाटपणा आणि कफापासून मुक्त होण्यास मदत करतात.गरम दुधाचे सेवन केल्याने शरीरात उष्णतेचा संचार होतो. या मुळे श्वासाचा त्रास कमी होण्यात मदत मिळते. 
 
11  विषाणूजन्य संक्रमण -व्हायरल इन्फेक्शनमध्ये हळदीचे दूध घेणे हे  सर्वोत्तम उपाय आहे, जे आपल्याला संसर्गापासून वाचवते.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पनीर गुलाब जामुन रेसिपी

सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा

शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या

जीवनसाथी चांगला मित्र होण्यासाठी हे उपाय अवलंबवा

पुढील लेख