Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

लवकर उठून व्यायाम केल्याचे फायदे जाणून घ्या

लवकर उठून व्यायाम केल्याचे फायदे जाणून घ्या
, बुधवार, 7 एप्रिल 2021 (11:47 IST)
बर्याच जणांना सकाळी उठून व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. पहाटे उठायचं, आवरायचं आणि जीममध्ये जायचं हे रूटिन अनेकांना नकोसं वाटतं. पण पर्याय नसल्याने बरेचजण सकाळी उठून जीममध्ये जातात. मात्र सकाळचा व्यायाम जास्त प्रभावी असल्याचं काही संशोधनांमधून समोर आलं आहे. रात्रीची सात ते आठ तासांची झोप मिळाल्याने शरीर ताजंतवानं झालेलं असतं. त्यामुळे व्यायामाचे सर्वाधिक लाभ मिळवायचे असतील तर सकाळी उठायला सुरूवात करा.
 
सकाळी बिछान्यात पडून राहण्याची सवय असणार्यांना या टिप्स नक्कीच मदतकारक करतील.
 
* जीममध्ये जात असाल तर सगळी तयारी रात्रीच करून ठेवा. तुमची बॅग भरून ठेवा. यामुळे सकाळी आवराआवरीला जास्त वेळ लागणार नाही आणि गडबड होणार नाही.
* वेळेत उठण्यासाठी रात्री लवकर झोपायला हवं. सकाळी कोणी उठवणारं नसेल तर फोनमध्ये अलार्म लावून घ्या. पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने चार ते पाच अलार्म लावा. यामुळे वैतागून का होईना, तुम्हाला उठावं लागेल.
* सकाळी उठल्यावर सर्वात आधी पाणी प्या. शक्यतो गरम पाणी प्यायला हवं. जीमला जायचं असलं तरी या नियमात कोणताही बदल करू नका. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ग्लासभर गरम पाणी प्या. जीममध्ये जोशात व्यायाम करायचा असेल तर जाताना ब्लॅक कॉफी प्या.
* तंदुरूस्तीचं महत्त्व तुम्ही जाणताच. हे ध्येय साध्य करायचं आहे हे मनावर ठसवत राहा. स्वयंप्रेरणा सर्वात महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा. मग काय दोस्तांनो, सकाळी लवकर उठायला सुरूवात करायची ना?
 
चिन्मय प्रभू

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गरुडाने घुबडाला विचारले माझा काय दोष