Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Corona virus: : वृद्धांनी या प्रकारे घ्यावी काळजी...

Corona virus: : वृद्धांनी या प्रकारे घ्यावी काळजी...
, गुरूवार, 26 मार्च 2020 (12:01 IST)
आजचा काळी जगात फक्त एकच नाव प्रतिध्वनीत होत आहे आणि ते आहे कोरोना व्हायरस. या विषाणूंबद्दल लोकांमध्ये भीतीचे वातावरण असलं तरी घाबरून न जाता त्याचाशी लढा देण्याची गरज आहे. थोडी सावधगिरी बाळगून आपण या समस्येपासून वाचू शकतो. लक्षत ठेवा की या विषाणूंची भीती बाळगण्याऐवजी आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तसेच आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा खबरदारी घेण्यास सांगावे.
 
 
प्रतिकारक शक्ती कमकुवत असते. म्हणून त्यांना संसर्ग सहजच होतो. कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी वृद्धांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 
 
सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे की आपले हात वारंवार धुवावे. जेणे करून आपले हात स्वच्छ राहतील आणि संसर्ग आपल्या शरीरात प्रवेश करणार नाही. यासाठी आळस न करता आपण आपल्या मोबाइलमध्ये रिमाइंडर पण लावू शकता.
 
वृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती खुपच कमकुवत असते यासाठी आपण आपल्या अन्नाकडे अधिक लक्ष दिले गेले पाहिजे. जेवणात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा, पाणी जास्त प्यावे, हलका व्यायाम करावा. 
 
ॐ चा जाप करावा, स्वतःला आरामशीर ठेवावे. 
 
ताजे अन्न खावे. शिळे आणि बाहेरचे अन्न खाऊ नका त्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
 
पूर्ण वेळ घरी राहणे कठीण असते त्या मुळे आपली चिडचिड होऊ शकते. आपणं आपला वेळ आपल्या परिवारातील सदस्यांना देऊन आपला वेळ घालवू शकता. या काळात आपण आपल्या वेळेला परिवारांसोबत घालवू शकता जे करणे आपल्याला शक्य नसते. 
 
आपणं आपल्या नातेवाईकांशी पण फोन किंवा व्हिडीओ कॉल करून आपला वेळ घालवू शकतात. 
 
आलं आणि तुळसीचा रसाचे नियमित सेवन जरूर करावे. हे फ्लूशी लढण्यासाठी खूप प्रभावी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे 3 घरगुती उपाय करा, कीटकांचा नायनाट करा.......