Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Mosquito Day 2026 : जागतिक डास दिन; डासांपासून बचावाचे सोपे उपाय

World Mosquito Day
World Mosquito Day : जागतिक डास दिनदरवर्षी २० ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस १८९७ मध्ये ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्डॉस  यांनी केलेल्या एका ऐतिहासिक शोधाच्या आठवणीत पाळला जातो. त्यांनी शोधून काढले होते की, मादी ॲनोफिलीस डास माणसांमध्ये हत्तीरोग आणि मलेरिया (हिवताप) पसरवण्यास कारणीभूत असते.
 

इतिहास

२० ऑगस्ट १८९७ रोजी ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी भारतातील सिकंदराबाद येथे एक महत्त्वाचा शोध लावला. त्यांनी सिद्ध केले की मादी अनोफेलिस डास मलेरियाचा परजीवी मानवांमध्ये पसरवतो. या शोधाबद्दल त्यांना १९०२ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. या दिवसाची सुरुवात स्वतः रॉस यांनी केली होती, जेणेकरून लोकांना डासांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल जागरूकता मिळावी.
 

उद्दिष्टे

डासांमुळे होणाऱ्या गंभीर आजारांबद्दल (मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका व्हायरस) लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्यापासून बचाव करण्याचे उपाय सांगणे. 
 

डासांमुळे होणारे प्रमुख आजार

मलेरिया
डेंग्यू
चिकनगुनिया
जपानी एन्सेफलायटिस
झिका विषाणू
भारत आणि विशेषतः महाराष्ट्रात पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाचे प्रमाण वाढते. बदलत्या हवामानामुळे डासांचा प्रसार आणखी वाढत आहे.
 

डासांपासून बचावाचे सोपे उपाय:

घराभोवती आणि परिसरात साचलेले पाणी पूर्णपणे काढून टाका. घर आणि परिसराभोवती पाणी साचू देऊ नका. 
मच्छरदाणी वापरा आणि पूर्ण बाहीचे कपडे घाला.
कढीपत्ता, निंबोळी किंवा लिंबाच्या सालीपासून बनवलेले नैसर्गिक उपाय वापरा.
ताप, डोकेदुखी, अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कुलर, पाण्याच्या टाक्या आणि कुंड्या नियमित स्वच्छ करा.
खिडक्यांना जाळ्या बसवा आणि पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा.
संध्याकाळच्या वेळी डास पळवणारे क्रीम किंवा कॉईल/मशीन वापरा.
 
डासांचा नायनाट करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे हीच डासांपासून होणाऱ्या आजारांवर मात करण्याची सर्वात प्रभावी गुरुकिल्ली आहे. या दिवशी आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन जागरूकता मोहिमा, फॉगिंग आणि सर्वेक्षणे राबवतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोणत्याही उपवासाला चालणारी, पौष्टिक अशा तीन खास टिक्की रेसिपीज