Marathi Biodata Maker

"शिवधनुष्य कुणी मोडलं..?"

Webdunia
बुधवार, 16 डिसेंबर 2020 (18:47 IST)
शाळेत इन्स्पेक्टर साहेब आले. त्यांनी एका मुलाला प्रश्न विचारला, 
"शिवधनुष्य कुणी मोडलं..?"
मुलगा घाबरून म्हणाला, "मी नाही मोडलं.."
साहेब चकित झाले.. त्यांनी गुरुजींना विचारले, "असं काय म्हणतो हा मुलगा..?"
गुरुजी म्हणाले, "परिस्थितीने गरीब आहे बिचारा, तो अशी काही तोडफोड करेल असं वाटत नाही."
साहेब तरातरा हेड मास्तरांकडे गेले आणि त्यांना म्हणाले,
"मी 'शिवधनुष्य कुणी मोडलं..?' असं विचारलं, तर तुमच्या शाळेतला मुलगा म्हणतो की 'मी नाही मोडलं' गुरुजी म्हणतात की 'मुलगा तसं काही करण्यातला वाटत नाही.' हा काय प्रकार आहे..?"
हेडमास्तरांना प्रचंड राग आला..ते म्हणाले, 
"कोण नाही म्हणतो..? छडी घेऊन गेलो ना की सगळे कबूल करतील 'मीच मोडलं' म्हणून..!"
प्रकरण गेले शिक्षण मंत्र्यापर्यंत..शिक्षणमंत्री म्हणाले, 
"हे पहा, आता मोडलंच आहे ना धनुष्य..? मग गप्प बसा. आधीच खूप गोष्टी अंगाशी आल्या आहेत, त्यात ही एक नको. येत्या बजेटला पैसे सँक्शन करतो, नवीन घ्या दोनतीन, आत्ता चर्चा नको..!"
साहेब हताश होऊन घरी आले.. बायकोला म्हणाले,
"मी एक प्रश्न विचारला, 'शिवधनुष्य कुणी मोडलं..?' तर कुणालाही माहिती नाही. तुला तरी आहे का माहिती..?"
 
बायको म्हणाली, "हे बघा, सकाळपासून काम करून करून मी दमले आहे. त्यात तुम्ही आता येऊन काहीतरी फालतू प्रश्न विचारत आहात. मला काय माहिती हे काय कुणी मोडलं ते..? तुमचं हे नेहमीचंच आहे, स्वत: मोडायचं आणि दुसऱ्यावर ढकलायचं...!"

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

बाहुबलीची अभिनेत्री अनुष्का शेट्टी अडकणार लग्नबंधनात

धुरंधर २: द रिव्हेंजच्या कलाकारांचे मानधन समोर आले, रणवीर सिंगने सर्वाधिक रक्कम घेतली

MANN-PISHACH केवळ ३३ हजार रुपये आणि दोन कलाकारांच्या मदतीने ८० मिनिटांचा चित्रपट कसा बनला?

मराठी चित्रपट “अभया”चा पहिला पोस्टर प्रदर्शित !ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडची दमदार प्रस्तुति !

अक्षय कुमार-प्रियदर्शन जोडीने धुमाकूळ घातला, 'भूत बंगला 'च्या टीझरने यूट्यूबवर 55 दशलक्ष व्ह्यूज ओलांडले

सर्व पहा

नवीन

अलका याज्ञिक यांनी वयाच्या सहाव्या वर्षी गायन कारकिर्दीला सुरुवात केली; आज त्या बॉलिवूडच्या अव्वल गायकांपैकी एक

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांच्या आईचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

पुढील लेख
Show comments