Dharma Sangrah

स्पर्शा शिवाय ही प्रेम असतं?

Webdunia
हो, असतं...
 
तिची तासनतास वाट बघणं...प्रेम असतं
विषय नसताना रात्रभर गप्पा मारणं.. प्रेम असतं
 
ड़ोळ्यांनी जाऊ नको आर्जव करणं...प्रेम असतं
शेजारी येऊन बस खुणावणं... प्रेम असतं
 
इतर कुणाशी बोलताना जेवढ्यास तेवढे ठेव.. सांगणं.....प्रेम असतं
घरी,ऑफिस पोहचल्यावर मॅसेजची वाट बघणं... प्रेम असतं
 
अर्ध पाणी प्यायला ग्लास.. तिने उचलणं..प्रेम असतं
चुकून स्पर्श झाला तर देहभर शहारणं... प्रेम असतं
 
तिने हाक मारली कि मोरपिस फिरणं..प्रेम असतं
सगळ्या सोबत असूनही ती हवीशी वाटणं... प्रेम असतं
 
सगळे फोटो , सगळ्या पोस्ट.. लाईक करणं...प्रेम असतं
इतर कुणी केलेल्या खास कमेंट्स वर चिड़णं... प्रेम असतं
 
बरं नसेल कधी तर शब्दातून सोबत करणं..प्रेम असतं
मांडीवर ड़ोक ठेवं बरं वाटेल ...आधार देणं... प्रेम असतं
 
चुक तिची असताना  Sorry म्हणणं ... प्रेम असतं
लांबून तिला बघताना लाजणं. .ओठांवर हसू येणं...प्रेम असतं
 
आवाज तिचा ऐकून  मोहरणं... प्रेम असतं
फोनवर बोलताना तिच्याशी..एकांत शोधणं..प्रेम असतं
 
तिने आवडता ड्रेस घातल्यावर खात्री पटणं..प्रेम असतं
आपण दिलेला गजरा माळल्यावर .. कळी खूलणं. ..प्रेम असतं
 
तिच्यासाठी हळवं होणं...प्रेम असतं
तिच्या सुखासाठी माघार घेणं ही.... प्रेमच असतं...
प्रेमच असतं हो ना ???
सर्व पहा

नक्की वाचा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी वयाच्या ६०व्या वर्षी बांधली होती लग्नगाठ

'काला हिरण'वरून नवा वाद! गोविंद नामदेवांचे निर्मात्यांवर गंभीर आरोप; सलमानच्या बॉडीगार्डने धमकावल्याचा अमित जानींचा दावा

International Picnic Day 2026 : आंतरराष्ट्रीय सहल दिवस, रंजक इतिहास आणि महत्व

"मी खूप औषधे घेत आहे," सोनू निगमने आपल्या प्रकृतीबद्दल खुलासा केला

अध्यात्माने भारलेला निसर्गरम्य, मार्कंडेय ऋषींच्या तपश्चर्येचे पवित्र स्थान मार्कंडेय पर्वत नाशिक

पुढील लेख
Show comments