Festival Posters

विनोदी कथा.. कावळ्यांचे अख्खे खानदान पिंडावर तुटून पडले

Webdunia
मंगळवार, 27 जानेवारी 2026 (16:09 IST)
आमचे एक शेजारी होते...
वय वर्षे पंच्याऐंशीं ते नव्वद....
मात्र स्मार्टफोन अगदी एखाद्या तरुणाला लाजवतील, इतक्या सफाईने वापरीत.
गेली पाच वर्षे काका अंथरूणावरच बेडरीडन होते. 
छंद फक्त एकच. स्मार्टफोन. 
हल्ली त्यांना फेसबुकचा नाद लागला होता. 
दर तासाला स्टेटस अपडेट करायचे. 
स्टेटस तरी काय??
बीपी अमुक,.. शुगर तमुक, ...
झोपल्या-झोपल्या काकांनी अनेक विविध क्षेत्रातले आभासी मित्र जोडले होते...
डॉक्टर, वकील, इंजिनियर, इतकंच काय तर 
मृत-सामग्री केंद्राचे मालक, वैकुंठ रथाचे ड्रायवर,
तेरा दिवसांचे काँट्रॅक्ट घेणारे, सर्व उपयोगी क्षेत्रातले लोक काकांचे आभासी मित्र होते..
रोज सकाळी मेसेंजर वर मेसेज यायचे..
"तैयारीकू लगू क्या??"
काका त्यांना ,"वेट अँड वॉच.." चा सल्ला द्यायचे..
एक मात्र विशेष मैत्रीण भेटली होती काकांना..
त्यांच्या प्रत्येक स्टेटस वर कॉमेंट करणारी..
शब्द संपले की, ती एखाद्या पायाच्या नखाने जमीन कुरतडणाऱ्या मांजरीचा फोटो टाकायची..
उत्तरादाखल काका टाळ्या पिटणारं माकड टाकायचे..
काकुला वाटायचं, आपल्याला माकड म्हणतो हा थेरडा.
ती वस्सकन फेंदारलेल्या मिश्यांची मांजर टाकायची..
एकंदरीत काय, यमराजाची वाट पाहणं सुकर झालं होतं फेसबुकमुळे..
आणि एक दिवस..
साक्षात यामराजाची फ्रेंड रिक्वेस्ट आली.
रेड्याचा व्हाट्सअप्प वर मेसेज आला..
"कमिंग टुडे..आवरतं घ्या.."
आदल्या रात्रीच काकांचं फोरजी बंद पडलं..
नियतीचे संकेत काकांना समजले..
रात्रभर बायको, मुलगा आणि सून..
गंगाजल घेऊन बाजूला बसले होते..
काका  शेवटचं स्टेटस अपडेट करत होते..
"आम्ही जातो आमुच्या गावा.."
सकाळी सकाळी काका गेले...
क्रियाकर्म आटोपले. ...
पिंडदानाचा दिवस आला.
दोन कावळे हजर होते. पण पिंडाला एकही शिवेना...
काकांच्या सर्व इच्छा पुरवायचे वचन दिल्या गेले,
पण कावळे अगदी ढिम्म...
सुनांनी त्यांना "सासूबाईंचा दर्जा देऊ.." हे मान्य केलं,
पण कावळे आपले हूं नाही की चुं नाही..
सगळे वैतागले. इतक्या समृद्ध माणसाचं मन कशात अडकलं असेल, समजायला मार्ग नव्हता..
शेवटी काकांचा नातू आला आणि म्हणाला,
आजोबा, तुमच्या अंतिम पोस्टला एकशे साठ लाइक  आले, आणि मुख्य म्हणजे तुमची
बेस्ट फ्रेंड आजी ची कॉमेंट पण आली,
Coming Soon, B Happy
अशी...
आणि काय आश्चर्य???
कावळ्यांचे अख्खे खानदान
पिंडावर तुटून पडले हो..
 
- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

आयुष्मान खुराना करण जोहरच्या 'उडता तीर'मध्ये दिसणार

आमिर खान या उद्योगपतीच्या बायोपिकमध्ये मोठ्या पडद्यावर दिसणार

भारतात अनके प्रसिद्ध शिव मंदिरे आहे; परंतु काही मंदिरांची त्यांच्या विशेष वैशिष्ट्यांमुळे एक वेगळी ओळख

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

पुढील लेख
Show comments