suvichar
✕

माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी

Webdunia
मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (10:17 IST)
कापड दुकानातले नोकर लोक हे गेल्या जन्मीचे (आणि या जन्मातले ही) योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे. 
बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही. 
 
लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत. 
 
बायका काय वाटेल ते बोलतात. "शी ! कसले हो हे भडक रंग.!"
लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्या सारखा चेहरा करुन असतो. निष्काम, निरहंकारी चेहरा.! 
समोरची बाई म्हणत असते,"कसला हा भरजरी पोत.!" हा शांत. 
गिऱ्हाईक नऊवारी काकू असोत, नाही तर पाचवारी शकू असो, ह्याच्या चेहऱ्यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते. 
समोर शेपन्नास साड्यांचा ढीग पडलेला असतो, पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा, तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाळीस अश्या किमती हा गृहस्थ, 
अथोक्षजाय नम:।
अच्युताय नम:।
उपेंद्राय नम:। 
नरसिंहाय नम:।
ह्या चालीवर सांगत असतो.
 
सगळा ढीग पाहून झाला तरी प्रश्न येतोच, "ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं.?"
एक वेळ तेराला तीनानं पूर्ण भाग जाईल; पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच. 
आपली स्वतःची बायको असून सुद्धा आपल्याला तिच्या चेंगटपणाची चीड येते. 
पण कापड दुकानातले ते योगीराज शांतपणं म्हणतात, "नारायण, इचलकरंजी लेमन घे !
 
खरेच, माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी.
 
-- पु. ल. देशपांडे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

नवीन

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

पुढील लेख
Show comments