Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

" तुला जे पटतंय ते कर , अन घे EXIT "

Webdunia
जन्म दिनांकाच्या दिवशीच 
मृत्यू दिनांक ठरलेला असतो 
मधला काळ कसा जगायचा 
ज्याचा त्यानी ठरवायचा असतो
 
इतरांवर टीका करत जगायचं 
का जीवनाचा आनंद घेत जगायचं 
हे आपलं आपण बघायचं 
 
सोबत येतानाच 
दुःख किती भोगायचं 
सुख किती द्यायचं 
सार ठरलेलं असतं 
 
माणूस विनाकारण 
विचार करत बसतं 
असं कसं झालं  ?
आणि तसं कसं झालं ?
 
तुमच्या अवती भवतीचे पात्र सुद्धा 
किती चांगले , किती वाईट 
कोण किती शिकणार , 
कोण कसं निघणार ?
 
लग्न होणार का नाही 
झालं तर टिकणार का नाही 
हे सर्व 
" आयुष्य " नावाच्या नाटकातले सिन असतात 
आपण फक्त आपला रोल करायचा 
बस्स !
 
विधात्याने एकदा तुमची स्क्रिप्ट लिहिली की लिहिली 
त्यात आपण बदल करू शकत नाही 
हे नीट समजून घ्या 
आणि आपलं आयुष्य मस्त पैकी जगा 
 
जग बदलण्याच्या भानगडीत न पडता 
आयुष्य " जगण्याच्या " भानगडीत पडा 
पुढचा माणूस असाच का वागतो ,
तसाच का बोलतो ,
अशा फालतू प्रश्नां वर विचार करू नका 
तो त्याचा रोल आहे , त्याला दिलेले डायलॉग वेगळे आहेत 
त्याचा रोल त्याला करू द्या
तुमचा रोल तुम्ही करा !
 
अरे पागल माणसां तू का चीड चीड करतोस ?
साधू , संत , सत्पुरुष , देव , थोडे मोठाले लोकं होऊन गेले का ?
त्यांचं फारसं कुणी ऐकलं नाही 
आणि तू का विनाकारण फुकटचे सल्ले देतो ?
लोकांच्या आयुष्याचं मातेर करू नकोस
अन स्वतःच्या आयुष्याची पण माती करून घेऊ नकोस !
" जीवन खूप सोप्प आहे "
तू ही भेऊ नकोस आणि दुसऱ्यालाही भेडऊ नकोस !
तूला जे पटतंय ते कर 
अन घे exit !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

आमिरचा नवीन लूक व्हायरल,चाहते घाबरले

स्वातंत्र्यवीर सावरकरचा ट्रेलर रिलीज

गरोदर दीपिकाचा धमाकेदार डान्स, लोकांनी ट्रोल केले

Ram Charan ला इडली-वडा म्हटल्याने शाहरुख खान अडचणीत, दक्षिण भारतीय चाहते संतापले

ऐश्वर्याच्या लेकीच्या लूकवर चाहते फिदा

पुढील लेख
Show comments