Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झोप......I love my zop

whats app message
झोप आहे माझी, 
माझ्या सारखीच वेडी...
 
नको तेव्हा जास्त अन् 
नको तेव्हा थोडी...!!
 
सुट्टीच्या दिवशी, 
पहाटेच जाते उडून...
 
इतर दिवशी, 
जाता जात नाही, 
डोळे सोडून...!!
 
तिच्या वेडेपणाची, 
मला पटतेच खात्री...
 
जेव्हा सोडून जाते, 
ती मला,
अचानक मध्यरात्री...!!
 
घरच्या दुलईत, घेते 
स्वतःला गुरफटून...
 
जागा बदलली, की 
बसते फुरंगटून...!!
 
'वामकुक्षी' हे तिचं, 
दुपारचं गोंडस नांव...
 
गोडाच्या जेवणानंतर, 
आवरता आवरत नाही 
राव...!!
 
भल्या भल्यांना ती, 
करते क्षणांत ढेर...
 
आणि वाढवते म्हणे, 
ती पोटाचा घेर...!!
 
'जांभया' हे तिच्या, 
आगमनाचे दूत...
 
जमवते कधी कधी ती, 
घोरण्याशी सूत...!!
 
ओढून घेऊन पापण्या, 
एकदा का झाली शांत...
 
मग नसते तिला, 
बाहेरच्या जगाची भ्रांत...!!
 
जेवढी गरजेची, 
देवावरची गाढ श्रध्दा...
 
तेवढीच आवश्यक 
माझ्यासाठी, 
माझी झोप सुद्धा...!!
 
कधी असून अडचण, 
कधी नसून खोळंबा...
 
माझी ही झोप, 
अशी कशी 
अगदीच वेडोबा...?!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणेरी ट्रीप मॅनेजर