Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हल्लीच्या बायकांचे मनातले श्लोक:-

whatsapp messages
, शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (12:13 IST)
जगी सर्व सूखी असा तोचि एक।
जयाच्या नशीबी मस्त-गाढ़ झोप॥
 
अनंता तुला मागणे हेचि आता।
पहिला चहा रोज आयता मिळावा॥
 
आज कुठली भाजी अन् आमटी करावी।
रोज रोज मला याची काळजी नसावी॥
 
कृपा मजवरी नित्य तुझी असावी।
कामाला 'बाई' देवा चांगली मिळावी॥
 
वाटेल तेव्हा मी, वाट्टेल ते खावे।
वजन माझे किंचित तरी ना वाढावे॥
 
मनावाटे तेव्हा शॉपिंग करावी।
कुठलीही ऑफ़र नाही सोडावी॥
 
सदा सर्वदा 'बॉस' प्रसन्न रहावा।
सुट्टी मागितली तरी ना चिडावा॥
 
वय माझे कितीही वाढत रहावे।
परी बालपण थोडे टिकून रहावे॥
 
नको रे मना काळजी ती कशाची।
मला दे कला आनंदी राहण्याची॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वकील उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित बायोपिक