एका शहरात शुद्धपट नावाचा एक स्वार्थी आणि धूर्त धोबी राहायचा. त्याच्याजवळ एक गाढव होते. गवत मिळत नसल्याने ते गाढव फारच अशक्त झाले होते. आता धोबीला चिंता पडली की, हे गाढव तर फारच अशक्त झाले आहे. मी याला धष्टपुष्ट करण्यासाठी पैसे कुठून आणू. खूप वेळ विचार केल्यानंतर धोबी फिरत फिरत एका जंगलात गेला. धोबीला रस्त्यात एक मेलेला सिंह दिसला. धोबीने त्या सिंहाचे कातड घेतले आणि घरी आला. त्या कातडयाकडे पाहून त्याला एक युक्ती सुचली.
धोबीने विचार केला की, हे सिंहाचे कातडे मी गाढवाच्या अंगावर टाकतो आणि गाढवाला पीक असलेल्या शेतांमध्ये पाठवतो. व राखणदार याला पाहून घाबरून पळून जातील व गाढवाला पीक खाता येईल.
आता धोबी दररोज गाढवाला शेतात सिंहाची कातडी पांघरून पाठवू लागला. सिंह शेतात आलेले पाहून राखणादर घाबरून पळून जायचे. रात्रभर गाढव कोवळ्या पिकांवर ताव मारायचा. हिरवे कोवळे पीक खाऊन गाढव धष्टपुष्ट झाले होते.
पण एक दिवस शेतातली राखणदारांनी हा विचार केला की, हा सिंह रोज शेतात येतो व आपले पीक खातो. पण सिंह तर मांसाहारी आहे तो गावात कसाकाय खाईल बरे? असा विचार सर्वांनी केला व त्याला पीक खाणाऱ्या सिँहाला पकडायचे ठरवले. राखणदारांनी एक गाढव शेतात नेऊन बांधले. नियमित प्रमाणे धोबीने त्याच्या गाढवाला सिंहाची कातडी पांघरून पाठवले. पण त्याला पाहून शेतातली बांधलेले गाढव ओरडायला लागले. गाढव ओरडते म्हणून कातडी पांघरलेले गाढव देखील जोरजोर्यात ओरडायला लागले. आता हे पाहून राखणदारांना मोठा धक्का बसला. व राखणदारांनी सिंहाच्या कातडीत असलेल्या गाढव काठ्यांनी खूप मारले. बिचारे गाढव मरण पावले. धूर्त आणि स्वार्थी धोबीमुळे गाढवाला आपले प्राण गमवावे लागले.
Edited By- Dhanashri Naik