Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पंचतंत्र कहाणी : बैल आणि सिंहाची गोष्ट

Kids story
, शनिवार, 28 सप्टेंबर 2024 (13:27 IST)
फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात तीन बैल राहायचे. तिघे खूप घनिष्ट मित्र होते. तसेच चारा खाण्यासाठी तिघेजण जंगलात जायचे. त्याच जंगलात एक सिंह राहायचा. या सिंहाची अनेक दिवसांपासून या बैलांवर नजर होती. हा सिंह तिघी बैलांना मारून खाणार होता. त्याने अनेक वेळेस बैलांवर आक्रमण केले.   पण त्याला यश आले नाही.  
 
पण सिहाला त्या बैलांना ठार मारून खायचे होते. सिहाला माहित झाले होते की, जोपर्यंत हे तिघे सोबत आहे तोपर्यंत त्यांना मारता येणार नाही. मग एकादा त्या तिघी बैलांना वेगळे करण्यासाठी त्याने एक योजना बनवली. सिहाने त्या तिघी बैलांना वेगळे करण्यासाठी जंगलात एक अफवा पसरवली की, या तिन्ही बैल मधील एक बैल आपल्या साथीदारांना धोका देत आहे. यामुळे तिन्ही बैलांच्या मनात संशय निर्माण झाला. 
 
एक दिवस या गोष्टीमुळे तिघी बैलांमध्ये भांडण झाले. सिंहला जे हवे होते तेच घडले. आता तिन्ही बैल वेगळे वेगळे राहायला लागले. त्यांची मैत्री तुटली होती. आता ते वेगवगळे होऊन जंगलात चारा खायला जायचे. व सिंहला या संधीचा फायदा घ्यायचा होता. 
 
सिंहाने एक दिवस तिघांपैकी एका बैलावर हल्ला केला. एकटा असल्यामुळे तो बैल सिंहाचा सामना करू शकला नाही. सिंहाने त्या बैलाला मारून टाकले. काही दिवसानंतर सिंहाने दुसऱ्या बैलाला देखील मारुन टाकले व खाऊन टाकले. आता फक्त एक बैल राहिला होता. त्याला समजले होते की, सिंह आता त्याला देखील मारून टाकेल व खाऊन घेईल. त्याच्याजवळ वाचण्याची आशा न्हवती. तो एकटा सिंहाचा सामना करू शकणार न्हवता. एकदा जेव्हा तो जंगलात चारा खाण्यासाठी गेला तेव्हा सिंहाने त्याच्यावर हल्ला करून त्याला मारून टाकले व खाऊन घेताले. सिंह आपल्या योजनेत यशस्वी झाला होता. अश्याप्रकारे सिंहाने एक एक करून तिन्ही बैलांचा फडशा पडला होता. 
 
तात्पर्य : एकात्मतेत मोठी ताकद असते. आपण नेहमी एकत्र राहावे आणि इतरांच्या म्हणण्यात येऊ नये.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उपवासाचा पदार्थ : शिंगाड्याच्या पिठाची पुरी