Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंचतंत्र कथा : ब्राह्मणाचे स्वप्न

kids stories panchatarntra story
, सोमवार, 25 जानेवारी 2021 (22:20 IST)
एक कंजूस ब्राह्मण एका शहरात राहत होता. त्याने भिक्षावळीमध्ये मिळालेल्या सातूच्या पिठाने एक माठ भरून ठेवला होता.त्याने त्या माठाला एका दोरीच्या साहाय्याने बांधून उंचीवर लटकवून ठेवले होते. त्याने आपले पलंग त्या माठाच्या खालीच लावून त्यावर तो निजला आणि स्वप्न बघू लागला. आणि नको त्या कल्पना करू लागला. 
 
त्याने विचार केला की जेव्हा देशात दुष्काळ पडेल त्यावेळी मी माझ्याकडील हे सातूचे पीठ 100 रुपयाला विकेन आणि त्या पैशांमधून दोन शेळ्या विकत घेईन.सहा महिन्यातच मी त्या शेळीपासून बऱ्याच शेळ्या विकत घेईन .नंतर त्यांना विकून एक गाय विकत घेईन. त्या गायीच्या नंतर एक म्हशी विकत घेईन नंतर घोडे विकत घेईन त्या घोड्यांना मोठ्या किमतीत विकून सोनं विकत घेईन आणि एक मोठं घर घेईन माझ्या कडे या पासून खूप संपत्ती असेल. मला एवढं श्रीमंत बघून कोणताही ब्राह्मण आपल्या देखण्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून देईल. ती सुंदर देखणी तरुणी माझी बायको बनेल.तिच्या पासून झालेल्या माझ्या मुलाचे नाव मी सोमेश्वर ठेवेन. जेव्हा तो  चालायला  शिकेल तेव्हा मी त्याला खेळताना बघेन. नंतर सोम खोड्या करू लागल्यावर मी बायकोला रागावून म्हणेन की ''आपल्या मुलाला सांभाळ''. 

 ती कामात असल्यावर माझे ऐकणार नाही तर मीच सोम ला शिस्त लावण्यासाठी मी त्याला मारण्यासाठी काठी घेईन आणि त्याच्या पाठीत घालेन. असं म्हणत त्याने बाजूला ठेवलेली काठी वर केली तर काय ती काठी त्या सातूच्या पिठाच्या माठाला लागली आणि त्यातील सर्व सातूचे पीठ सांडले. त्या कंजूस ब्राह्मणाचे सर्व स्वप्न देखील त्या सातूच्या पीठासह मातीत गेले.  
 
तात्पर्य : कर्म करा नुसतं स्वप्न बघू नका.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मायक्रोव्हेव्हची स्वच्छता कशी करावी काही सोप्या टिप्स जाणून घ्या