एका जंगलात एक कोल्हा राहायचा. तो जंगलात भटकंतीचं करायचा. एके दिवशी तो अन्नाच्या शोधात वणवण भटकू लागला. त्याला खायला काहीच मिळाले नाही. तो फिरत-फिरत एका द्राक्षाच्या मळ्यात जाऊन पोहोचला. त्याची नजर त्या द्राक्षाच्या मळ्यात सर्वीकडे लोंबकळत असलेल्या द्राक्षांवर जाऊन थांबते. तो विचार करतो की वा! ही फळे खूपच चविष्ट दिसत आहे. मला ही खायला पाहिजे. त्याच्या तोंडाला पाणी सुटतं.
कोल्हा थोड्या वेळ तसाच बसला नंतर तो ते द्राक्ष मिळविण्याचा प्रयत्न करू लागला. तो ते द्राक्ष पकडण्यासाठी उंच उडी मारू लागला. पण काय जवळ दिसणारे द्राक्ष तर लांब होते. तरी त्याने ते द्राक्ष मिळविण्यासाठी पुरेपूर जोर लावला. शेवटी तो प्रयत्न करून दमला आणि खाली कोसळला.
शेवटी त्याला द्राक्षे काही मिळाली नाही. तो मनातच म्हणतो की नको मला ही आंबट द्राक्षे असे म्हणून तो आपल्या घराकडे निघून जातो.
बोध : नेहमी क्षमतेनुसार काम करण्याचा प्रयत्न करावा.