Festival Posters
✕

स्टीलच्या डब्यात या गोष्टी ठेवणे धोकादायक ठरू शकते, पोषक तत्वे नष्ट होतात

Webdunia
गुरूवार, 24 जुलै 2025 (21:04 IST)
स्टीलचे डबे आकर्षक आणि टिकाऊ दिसतात, परंतु त्यात सर्वकाही ठेवणे आरोग्यासाठी चांगले नाही. काही अन्नपदार्थ असे आहे जे स्टीलशी किंचित रासायनिक प्रतिक्रिया देऊ शकतात, ज्यामुळे त्यांची गुणवत्ता आणि पोषक तत्वे कमी होऊ शकतात. स्टीलच्या डब्यात किंवा भांड्यात कोणत्या गोष्टी ठेवण्यापासून टाळावे ते जाणून घेऊया.
ALSO READ: पावसाळ्यात शेव-फरसाण नरम पडून चव बिघडते याकरिता अवलंबवा या सोप्या टिप्स
लोणचे
लोणच्यामध्ये भरपूर तेल, मीठ आणि आम्ल असते हे घटक स्टीलशी प्रतिक्रिया देऊ शकतात आणि धातूचे आयन सोडू शकतात, जे लोणच्याची चव आणि रंग खराब करतात आणि आरोग्यासाठी देखील हानिकारक असू शकतात. याकरिता लोणचे काचेच्या बरणीत ठेवावे.  
 
दही
दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे स्टीलशी थोडीशी प्रतिक्रिया देऊ शकते. यामुळे दह्याला आंबट किंवा विचित्र चव येऊ शकते आणि त्याचा पचनावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याकरिता दही चिकणमाती, काचेच्या बरणीत ठेवावे. 
 
लिंबू किंवा टोमॅटो
यामध्ये सायट्रिक अॅसिड असते, जे स्टीलच्या संपर्कात आल्यावर धातूचे कण अन्नात मिसळू शकते. याचा अन्नाच्या चव आणि पौष्टिकतेवर परिणाम होतो. याकरिता काच किंवा प्लास्टिक डब्ब्यात ठेवावे. 
 
कापलेली फळे
कापलेली फळे लवकर ऑक्सिडायझ होतात आणि स्टीलच्या संपर्कात आल्यावर त्यांचा रंग आणि चव खराब होऊ शकते. व्हिटॅमिन सीसह इतर पोषक घटक देखील कमी होऊ शकतात. याकरिता फळे हवाबंद काचेच्या डब्ब्यात ठेवावे. 
 
मीठ 
स्टीलमध्ये मीठ जास्त काळ साठवल्याने कंटेनरमध्ये गंज येऊ शकतो आणि मिठाच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होऊ शकतो. याकरिता मीठ प्लास्टिक किंवा काचेच्या डब्ब्यात ठेवावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: भाजी जास्त तिखट झाल्यास तिखटपणा कमी करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: भाजी बनवल्यानंतर त्यात हा आंबट पदार्थ घाला; उत्तम चव येईल

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments