अनेकदा जेवण बनवताना अंदाज चुकला की मीठ जास्त पडतं आणि पदार्थ फसला म्हणून आता काय करावं अशी काळजी वाटू लागते. अशात काही सोपे उपाय करुन पटकन पदार्थ चविष्ट करता येऊ शकतो-
रस्सा भाजीत मीठ जास्त झाल्यास त्यात थोडा उकडलेला बटाटा घालावा.
वरणात मीठ जास्त झाल्यास कणकेचा छोटा गोळा घालावा. यामुळे जास्त झालेलं मीठ शोषलं जाईल.
नंतर कणकेचा गोळा किंवा बटाटा काढून घ्या.
सुकी भाजीत मीठ जास्त पडलं तर त्यात जरा भाजलेलं बेसन किंवा दाण्याचं कूट घालू शकता.
मीठ जराच जास्त पडलं असल्यास लिंबू पिळून काम चालवता येऊ शकतं.
जास्त प्रमाणात जेवण तयार करत असताना 2-3 बटाटे शिजवून वेगळ्याने ठेवले पाहिजे ज्याने भाजी कमी पडल्यास किंवा मसाले- मीठ जास्त झाल्यास कस्करुन घालता येतात.