Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नातं तुटण्यासाठी या 4 चुका देखील पुरेशा असतात

नातं तुटण्यासाठी या 4 चुका देखील पुरेशा असतात
, शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (16:10 IST)
'ब्रेकअप्स का होतात?याचे अचूक उत्तर कोणाकडे नसेल कारण ब्रेकअपचे कोणतेही एक कारण नाही. विभक्त झालेल्या प्रत्येक जोडप्याचे नाते संपुष्टात येण्यामागे अनेक कारणे असतात, परंतु अशी काही कारणे आहेत ज्यामुळे बहुतेक ब्रेकअप होतात. अशा परिस्थितीत, ही कारणे कोणती आहेत हे जाणून घेऊन आपल्या नात्याची चाचणी घ्या, जेणेकरून पुढे जाऊन ही कारणे आपल्या नात्यासाठी धोकादायक ठरू नयेत.
 
1 एकमेकांना श्रेष्ठ मानणे- अनेक जोडपी स्वतःला एकमेकांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करतात. असे देखील घडते की जोडीदारपैकी एक स्वतःला श्रेष्ठ पाहतो. अशा परिस्थितीत दुसरा पार्टनरही या नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, पण हळूहळू पार्टनरच्या अशा सवयीमुळे दुसरा पार्टनर अस्वस्थ होऊ लागतो. आणि हे कारण देखील नात्याला तोडण्यासाठी पुरेसे आहे.
 
2 एक्स्ट्रा अफेअर-रिलेशनशिपमध्ये असताना दुस-यासोबत संबंध ठेवणे कोणत्याही प्रकारे योग्य मानले जाऊ शकत नाही. अनेकजण गंभीर नात्यात आल्यानंतर 'फक्त गम्मत म्हणून'  नाते ठेवतात. अशा वेळी आकर्षण किंवा फ्लर्टसारख्या गोष्टीही नात्याला तोडतात.
 
3 एकमेकांना वेळ न देणे- कोणत्याही नात्याला वाढवण्यासाठी एकमेकांना वेळ देणे खूप गरजेचे असते. एकमेकांशी बोलणे देखील खूप महत्वाचे आहे. काही वेळा एकमेकांना वेळ न दिल्याने जोडपे एकमेकांना नीट समजून घेत नाहीत.या मुळे नातं तुटतं.
 
4 जोडीदाराची काळजी किंवा आदर न करणे -जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सहज सापडते तेव्हा बहुतेक लोक त्याची जोपासना करत नाहीत. प्रेमाच्या बाबतीतही असेच घडते. जर आपण देखील आपल्या जोडीदाराची काळजी घेतली नाही किंवा आदर दिला नाही तर नात्यातील अंतर वाढू लागते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रक्तातील साखरेची वाढ रोखण्यासाठी मधुमेहाचे त्रास कमी करण्यासाठी ही तीन योगासने प्रभावी आहे