Publish Date: Fri, 20 Feb 2026 (15:47 IST)
Updated Date: Fri, 20 Feb 2026 (15:58 IST)
साहित्य-
अंडी: ४-५ (उकडलेली)
बासमती तांदूळ: २ वाट्या (३० मिनिटे भिजवलेला)
कांदा: ३ मोठे (उभ्या फोडी केलेला - त्यातील अर्धा तळून 'बरिस्ता' करण्यासाठी)
टोमॅटो: २ मध्यम (बारीक चिरलेले)
दही: अर्धी वाटी (फेटलेले)
मसाले आणि पेस्ट-
आले-लसूण पेस्ट: १ मोठा चमचा
हिरवी मिरची: २-३ (मधल्या भेगा पाडलेल्या)
लाल तिखट: १-२ चमचे
हळद: अर्धा चमचा
बिर्याणी मसाला: १ मोठा चमचा
धणे-जिरे पूड: १ चमचा
पुदिना आणि कोथिंबीर: प्रत्येकी अर्धी वाटी (बारीक चिरलेली)
अख्खा गरम मसाला-
तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी, मोठी वेलची, जिरे.
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या टोपात पाणी उकळायला ठेवा. त्यात मीठ, तमालपत्र, लवंग आणि थोडे तेल टाका. आता भिजवलेला तांदूळ घालून तो ७०-८०% शिजवून घ्या. भात शिजला की पाणी काढून टाकून तो मोकळा करून ठेवा. आता उकडलेल्या अंड्यांना चाकूने थोडे टोचे मारा. कढईत थोडे तेल, हळद, तिखट आणि मीठ टाकून अंडी त्यावर सोनेरी रंगाची होईपर्यंत परतून घ्या आणि बाजूला ठेवा.
बिर्याणी मसाला तयार करणे
आता त्याच कढईत थोडे अधिक तेल किंवा तूप गरम करा. त्यात अख्खा गरम मसाला आणि जिरे टाका.
आता कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परता.
टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा. आता हळद, तिखट, धने-जिरे पूड आणि बिर्याणी मसाला घाला.
गॅस कमी करून त्यात फेटलेले दही घाला आणि तेल सुटेपर्यंत परता. आता यात फ्राय केलेली अंडी आणि अर्धा कप पाणी घालून २-३ मिनिटे शिजवा.
बिर्याणीचा थर
आता अंड्याच्या ग्रेव्हीवर थोडा पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला कांदा (बरिस्ता) टाका.
त्यावर शिजवलेला भात सारखा पसरवून घ्या.
भातावर पुन्हा उरलेला तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि थोडे साजूक तूप सोडा. (हवे असल्यास थोडे केशर दूध किंवा फूड कलर टाका).
टोप झाकणाने बंद करा (हवाबंद करण्यासाठी पिठाची कणिक लावू शकता) आणि मंद आचेवर १०-१५ मिनिटे दम द्या.
वाढण्याची पद्धत
गरमागरम अंडी बिर्याणी थंडगार कांदा-काकडीचा रायता किंवा सालनसोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik