Festival Posters

अनंत हलवायाचे दुकान पण काव्यमय !!!

Webdunia
बुधवार, 24 मार्च 2021 (16:19 IST)
"पीत" "केशरी" वलय नलिका
"पाक" जिचा स्थायी भाव,
लग्न भोजनी अजुनी मिरविते
"जिलेबी" तिचं नाव !!!
 
चंद्ररुपेरी वर्ख वदनी
मावाजडित जिची काया,
रंगीत वसनी "बर्फी" सुंदरी
जरा जपून खा तू राया !!!
 
पिवळे धम्मक कण मोत्यांचे
गळती झार्‍यातुनी पाकात,
गोल, लडदू बुंदीलाडू
सत्वर आणतो पाणी मुखात !!!
 
साखरेत घोळवा, पाकात बुडवा
करा गोल अथवा दंडगोल,
"गुलाबजाम" परी तोच रहातो
मिरवित आपला राजस डौल!!!
 
पक्वानांच्या सौंदर्यांमध्ये
नित्य ज्याची बोलवा,
लाल, हिरवा रंग लेऊनी
खुणवी डोळ्यास बदाम हलवा !!!
 
वरुन खडबडीत, आतून खडबडीत
गडी दिसतो पिवळा जर्द,
"म्हैसूरपाक" म्हणती याला
हा तर पठ्ठ्या मिठाईतला मर्द!!!
 
श्रीकृष्णाचे नाव मिरवितो
थोडा दुर्मिळ आहे बाळ,
चव ज्याची वेड लाविते
असा "गुर्जर" "मोहनथाळ" !!!
 
धागा धागा गुंफगुंफुनी
आचार्‍याचे कसब मोजते,
श्वेतसुंदरी "सुतरफेणी"
जिभेवर ठेवता उगीच लाजते!!!
 
थरावर थर नाजूक तेचा
मुंबापुरीत ज्याचे मूळ,
पातळ असे जरी "माहीम हलवा"
चवीने जगास लावतो खूळ !!!
 
कैक मिठाया गोडगोजिर्‍या
हलवाई बनविण्या घाम गाळतो,
जिभाजिभांवर खवैय्यांच्या
गोड चवीचा रंग उधळीतो !!!

- सोशल मीडिया 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

अकबर-बिरबलची कहाणी : सत्याचा नेहमीच विजय होतो

अतिशय सोपी, स्वादिष्ट स्टार्टर साइड डिश; बटर गार्लिक चिकन बाईट्स

मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करताय? मग 'बाबा' होण्याचं स्वप्न अधूरं राहू शकतं!

Yoga Slogans in Marathi योग घोषवाक्य

प्रियांका चोप्राच्या आईने त्यांच्या दाट केसांचे गुपित सांगितले असून, हा घरगुती उपाय व्हायरल

पुढील लेख
Show comments