Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाढदिवसाचा आंनद

Happy birthday
, मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (13:10 IST)
वाढदिवसाचा आंनद की काय समजे न मला,
एक दिवसांनी मोठे झालो, ही जाणीव मनाला,
मागे सरत गेलं आयुष्य, खूप दूर निघून,
काही निसटतय का काही बरं आपल्या हातून?
समजतंय पुन्हा मागचा क्षण येणे नाही फिरून,
घुसमट होतेय मनाची, तोच विचार करून करून,
आता कितीसा वेळ ठेवलाय देवांन आपुल्या साठी,
अजून किती जुळणार, ऋणानू बंधाच्या गाठी,
किती स्वप्नं होणार पूर्ण, आणि किती राहील अधुरे,
सुटतील का आयुष्यातील अनुत्तरीत सारे,
असो काहीही असलं तर एक मात्र सत्य हेच,
एक वर्ष वाढलं आपलं, वेचायच ते वेच !
.....अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरात पाल आणि झुरळ झाले आहेत, घरगुती उपाय करून बघा