Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नात्यांना पण आयुष्य असतं बरं....

marathi poem
, गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (16:11 IST)
नात्यांना पण आयुष्य असतं बरं,
पण वाटत नाही आपुल्याला खरं,
एखादी ओळख होतें, घट्ट होत जाते,
त्यांच्या विना आपले पान ही हलणे अशक्य होते,
दिवस रात्र आपण संपर्कात येतो ज्याच्या,
कोणे दिवशी मात्र, सर्वात दूर असतो त्याच्या,
हे कसें, आणि का होतं ते समजत नाही,
पण कधी कधी मात्र, समजून वळत नाही,
राहतात मात्र, आठवणीच आठवणी,
येतं हसू ओठावर कधी, कधी मात्र पाणी,
समजत असत आपल्याला सैल होताहेत गाठी,
का पण माणूस धडपडतो, त्या घट्ट करण्या पाठी,
जे झालं ते स्वीकारावं, तेच असत शहाणपण,
नाहीतर आहेत नात्याची फरफड आणि वणवण .!
.....अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hair Spa घरीच बनवा क्रीम आणि घरातच करा पार्लर सारखा हेअर स्पा