Dharma Sangrah

आता हळूहळू सावरासावर करावी

Webdunia
गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (09:41 IST)
आता हळूहळू सावरासावर करावी,
मनास कुठंतरी थांबायची सवय लावावी,
गुंतण नकोच आता कशातही अजिबात,
ह्याच वयात करावी त्याची सुरुवात,
हळहळ पण किंचीत कमीच करावी,
जे सुटलं त्याची काळजी जाणीवपूर्वक टाळावी,
स्वार्थी म्हटलं तरी चालेल, पण आपल्या पुरतं बघावं,
कोणी काही म्हटलं म्हणून उगाच रागावणं थांबवावं,
अलिप्तता थोडी थोडी अंगीकारावी,
दुरूनच दाद द्यायला यायला मात्र हवी,
कुणी अगत्याने विचारलं च काही तर थोडं सांगावं,
त्याच्यावर मात्र आपल्या इच्छेच ओझं नाही द्यावं,
निसर्गाच्या सानिध्यात घालवावे उर्वरीत काळ,
अशीच स्वीकारावी आयुष्याची आलेली संध्याकाळ!
...अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

दररोज फक्त ४ ते ६ बदाम खाण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे; संशोधनातून मोठा खुलासा!

फादर्स डे निमित्त वडिलांसाठी सोपी आणि चविष्ट पारंपरिक मिठाई रेसिपी

रात्री व्यवस्थित झोप येण्यासाठी हे उपाय अवलंबवा, पटकन झोप येईल

मार्केट रिसर्च क्षेत्रात कसे बनाल तज्ज्ञ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

चेहऱ्यावर मध लावण्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

पुढील लेख
Show comments