सवय, कधी, कुठं, कुणाची अन कशाची लागेल नाही येत सांगता,
स्वीकारतो आपण नकळत त्यास, आपल्यास ही न समजू देता,
सोबतीस असतो जो कोणी, त्याची एखादी सवय अंगवळणी पडते,
आपणही तसंच करायला लागतो, जी सवय त्यास असते,
बोलण्यातला शब्द असो, की लकब एखादी,
आपसूकच आपणही करतो तसंच, सुरू होतच ते कधी न कधी!
एखाद्या मुलुखात काही काळ बघा घालवून,
त्यांचीच भाषा शिकून घेतो आपण, बघा आजमावून!
चांगल्या सवयी कुणाच्या, आकर्षित आपल्याला करतात,
आपण ही त्या आत्मसात करतो, त्या प्रगतीपथावर नेतात,
चांगलं ते जरूर घ्यावं मंडळी, संकोच कशाचा!
वांगल्या मात्र अजिबात नकोय आपल्या जवळ फटकायला!!