Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माणूस जसा भासवतो, खरं तो तसाच असतो?

marathi poem
, गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (17:30 IST)
माणूस जसा भासवतो, खरं तो तसाच असतो?
वरपांगी सोंग घेऊनच तो जगत असतो,
म्हणतात ना खायचे दात वेगळे अन दाखवाचे वेगळे,
त्यातच वरील मर्म दिसून येतं की सगळे!
का म्हणून पण असं वागायचं सतत ढोंगी,
फसवणूक इतरांची,जणू मिळालेली परवानगी,
आपण ही चुकतो, ओळखता यायलाच हवं,
जे जसं वागतात त्या भाषेत उत्तर द्यायला यायला हवं,
मग बसेल कुठंतरी आळा, असं समजू या,
जगायची ही नवी पद्धत आपण ही शिकू या!
...अश्विनी थत्ते
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुम्हाला दररोज किती लोह (iron) आवश्यक आहे, योग्य प्रमाणात जाणून घ्या