Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वयंपाक रूपी परमेश्वर

marathi kavita
, मंगळवार, 11 जानेवारी 2022 (11:42 IST)
चुल आणि ओटा
हाची परमार्थ मोठा
मीठ मसाल्याची दाणी
मनी कृष्णाची गाणी
पहा मळली कणिक
आहे प्रपंच क्षणिक
छान भाजी ती चिरली
सारी चिंताच जिरली
दिली खमंग फोडणी
केली भोगांची तोडणी
हाती तवा पोळपाट
उरी भक्तीचिये लाट
ताट आणि वाटी
सारे कृष्ण प्रेमासाठी
पळी आणि झारा
आता ना येरझारा
केला वरण मऊ भात
कृष्ण माझे जगन्नाथ
वर तुपाची ती धार
सोपविला सर्व भार
तळली गोल पुरी
कृष्णध्यास लागे उरी
केले कालवण सार
आता संसार हा पार
बघा झाला स्वयंपाक
दिली सद्गुरूंसी हाक
दिली यजमाने पुष्टी
रक्षी कृष्णाचिये दृष्टी.
 
-सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

National Youth Day 2022 स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो, कारण आणि इतिहास जाणून घ्या