Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खरेदीचा चांगला पर्याय

great shopping option
, गुरूवार, 14 जानेवारी 2021 (16:28 IST)
आजकाल सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला विंटेज सेलर्स पाहायला मिळतील. त्यातच सध्या पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होत असल्यामुळे लोक नवे कपडे खरेदी करण्याऐवजी सेकंड हँड कपडे विकत घेत आहेत. काही ब्रँड्‌स असे सेकंड हँड कपडे उपलब्ध करून देतात. दरवर्षी जवळपास 100 अब्ज नवे कपडे तयार केले जातात. या प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी होते. हे टाळण्यासाठी सेकंड हँड कपडे खरेदी करणं हा चांगला पर्याय ठरू शकतो.
* सेकंड हँड कपड्यांच्या क्षेत्रात नव्यानेच एंट्री केली असेल तर तुम्ही वॉर्डरोब स्टेपल्समध्ये गुंतवणूक करू शकता. सदाबहार फॅशनचे कपडे खरेदी करा. हे कपडे कधीही ङङ्गआउट ऑफ फॅशन' होत नाहीत.
* सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असाल तर तुम्हाला विंटेज सेलर्स मिळतील. इथे तुम्हाला स्टायलिंग टिप्सही दिल्या जातील. तुम्ही तुमच्या आवडीच्या ब्रँड्‌सची पेजेस लाईक करू शकता. यामुळे तुम्हाला सतत अपडेट्‌स मिळत राहतील आणि खरेदी करणं सोपं जाईल.
* सेकंड हँड कपडे घेताना साईजच्या बाबतीत अजिबात गोंधळ करू नका. तुमच्या साईझचेच कपडे घ्या. अर्थात बरेच विंटेज विक्रेते कपडे लहान करून देतात. मात्र कोणताही धोका पत्करण्यात अर्थनाही.

स्वाती पेशवे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दंतारोग्य आणि फ्लोराइड