Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत 'या' १० गोष्टी ठेवायला विसरू नका

Webdunia
बुधवार, 4 फेब्रुवारी 2026 (15:55 IST)
प्रवासाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी, बॅग भरताना खालील १० महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत आहे  की नाही, याची खात्री नक्की करा. 
 
१. ओळखीचा पुरावा  
आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यांच्या मूळ प्रती  आणि काही झेरॉक्स सोबत ठेवा. हॉटेल बुकिंग किंवा प्रवासादरम्यान याची गरज भासते.
 
२. प्रथमोपचार पेटी 
डोकेदुखी, ताप, पोटदुखी, अंगदुखी यांसारखी सामान्य औषधे, बँडेज, डेटॉल आणि तुमची नियमित सुरू असलेली औषधे एका लहान बॅगेत सोबत ठेवा.
 
३. पॉवर बँक आणि चार्जर 
प्रवासात नकाशा पाहण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी मोबाईलचा वापर जास्त होतो, त्यामुळे बॅटरी लवकर संपते. अशा वेळी पॉवर बँक खूप कामाला येते.
 
४. पाण्याची बाटली आणि सुका मेवा 
प्रवासात नेहमी स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवा. तसेच भूक लागल्यावर खाण्यासाठी ड्राय फ्रूट्स, बिस्किटे किंवा राजगिरा लाडू यांसारखे ऊर्जा देणारे पदार्थ जवळ ठेवा.
 
५. रोख रक्कम 
आजकाल सगळीकडे डिजिटल पेमेंट चालते, तरीही काही दुर्गम भागात किंवा नेटवर्क नसलेल्या ठिकाणी 'कॅश' असणे अत्यंत आवश्यक असते.
 
६. वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तू 
टूथब्रश, पेस्ट, साबण, शॅम्पू, सॅनिटायझर, सनस्क्रीन, ओले टिश्यू (Wet Wipes) आणि टॉवेल या गोष्टी आपल्या बॅगेत असायलाच हव्या.
 
७. हवामानानुसार कपडे  
तुम्ही कुठे जात आहात (थंड हवेचे ठिकाण की समुद्रकिनारा) हे पाहून कपडे निवडा. पावसाची शक्यता असल्यास छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवा.
 
८. युनिव्हर्सल अडॅप्टर 
जर तुम्ही परदेशात जात असाल किंवा लांबचा प्रवास असेल, तर वेगवेगळ्या सॉकेट्ससाठी युनिव्हर्सल अडॅप्टर सोबत असणे सोयीचे ठरते.
 
९. डायरी आणि पेन 
काही महत्त्वाचे नंबर, पत्ता किंवा प्रवासातील आठवणी नोंदवण्यासाठी डायरी आणि पेन उपयोगी पडते. मोबाईल बंद पडल्यास हे खूप महत्त्वाचे ठरते.
 
१०. प्लास्टिक पिशव्या  
वापरलेले (घाण) कपडे ठेवण्यासाठी किंवा कचरा टाकण्यासाठी काही रिकाम्या प्लास्टिक पिशव्या किंवा कापडी पिशव्या सोबत ठेवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: या १० सवयींमुळे तुमचे 'स्मार्टफोन'चे आयुष्य वाढेल!
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: गुगल मॅप्सशिवाय प्रवासात मदत करणारे हे ५ ॲप्स तुमच्या फोनमध्ये आजच डाऊनलोड करा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

Nag Panchami 2026 Wishes in Marathi नागपंचमीच्या शुभेच्छा संदेश

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

उपवासाच्या दिवशी झटपट बनणारी चविष्ट रेसिपी Curd Potatoes

हात-पायांना मुंग्या येण्यामागे कोणती कारणे असू शकतात? जाणून घ्या

NPCC Recruitment :एनपीसीसी लिमिटेडमध्ये व्यवस्थापक पदासह २६ पदांसाठी भरती, पात्रता इतर माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments