जेव्हा मुली तारुण्याच्या उंबऱ्यावर पाऊल टाकतात तेव्हा, त्यांच्या स्वभावात बरेच बदल होतात. मुलींना असं वाटते की त्यांना कोणीच समजून घेत नाही . वास्तविक वयाच्या या काळात मुलींना आपल्या आई कडून खूप अपेक्षा असतात. प्रत्येक आईची मुलींना वाढविण्याची पद्धत वेग वेगळी असते. काही माता खूप स्वभावाने कठोर असतात तर काही खूप मऊ असतात. असे दोन्ही प्रकार वाईट असतात. म्हणून आवश्यक आहे की या वयात आपण आपल्या मुलीची सर्वात चांगली मैत्रीण बनाव.चला तर मग जाणून घेऊ या की कशा प्रकारे आपण आपल्या मुलीची सर्वात चांगली मैत्रीण बनू शकता.
* काळजीपूर्वक ऐकावं -
या वयात मुलींना वेगवेगळे अनुभव येतात. या मुळे काही अनुभव खूप चांगले असतील तर काही त्रासदायी असतील. अशा मध्ये त्यांना गरज असते की त्यांचे कोणी ऐकावे.जर आपण या काळात त्यांच्या कडे दुर्लक्ष केले तर ती आपल्यासह काहीही गोष्ट सामायिक करायला विचार करेल आणि आपण संयमाने तिचे बोलणे ऐकले तर ती नेहमी आपल्या बरोबर गोष्टींना सामायिक करेल.
* अति प्रतिक्रिया देऊ नका-
जेव्हा देखील आपली मुलगी आपल्याला काही गोष्ट सांगत असेल तर त्यावर अति प्रतिक्रिया देण्याऐवजी ती काय सांगत आहे ऐकून घ्या. आपल्याला असे वाटत आहे की ही गोष्ट वाईट आहे किंवा आपल्या आकलनाच्यापलीकडली आहे, तर त्या गोष्टीवर मुलीच्या दृष्टीकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या आणि तिच्या काळात बराच फरक आहे.
* प्रत्येक गोष्टीसाठी नाही म्हणू नका-
या वयात मुलं आपल्या मित्रांना फिरताना पार्टी करताना आणि एन्जॉय करताना बघतात तर त्यांना देखील असं वाटते की त्यांनी देखील या गोष्टी कराव्यात अशा परिस्थितीत तिला प्रेमाने समजावून सांगा आणि प्रत्येक गोष्टीसाठी नाही म्हणू नका अन्यथा मुलींना बागी होण्यास वेळ लागणार नाही .तिला असं वाटेल की तिच्या वर बंदी घालण्यात येतं आहे म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी तिला नाही म्हणू नका. तिला होकार देऊन जाणीव करून द्या की आपण तिला समजत आहात.
* रागावू नका-
या वयात जर आपण आपल्या मुलीवर जास्त प्रमाणात राग कराल, किंवा तिच्यावर चिडाल तर ती आपल्या पासून लांब होईल. या नंतर मैत्री चे नाते टिकवून ठेवणे कठीण होईल. म्हणून तिच्या वर रागावण्याऐवजी तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. या ऐवजी तिला घरातील सदस्यांच्या फटकारण्या पासून देखील वाचवा. असं केल्यानं मुलगी आपल्यावर विश्वास ठेवेल.