श्री विष्णूंचा मस्तकावर सदैव असतो शेष,
… रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश
वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल,
… रावांच्या जीवनात टाकले मी पाऊल
शरदाचे संपले अस्तित्व, वसंताची लागली चाहूल,
…रावांच्या संसारात टाकते पहिले पाऊल
पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल,
…रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल
नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,
…रावां सोबत आली मी सासरी
सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
… रावांचे नांव घेते, …च्या घरात
आकाशाच्या प्रांगणात ब्रम्हा विष्णू आणि महेश,
…रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश