Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गरोदरपणात कार चालविणे आणि सीट बेल्ट बांधणे किती योग्य

Webdunia
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (21:53 IST)
सर्वांना हे माहिती आहे की गरोदरपणाचे दिवस किती नाजूक आणि अवघड असतात. परंतु या साठी आपण सामान्य दिनचर्या थांबवू शकत नाही. या काळात दररोज सामान्य आयुष्य जगावेच लागते. काही महिला या काळात ऑफिसात जातात आणि या साठी त्या कारचा वापर करतात. या अवस्थेत कार चालविणे योग्य आहेत का किंवा सीट बेल्ट बांधणे योग्य आहे का?  चला तर मग जाणून घेऊ या.
 
* कार चालवणे योग्य आहे का? 
गरोदरपणाच्या सुरुवातीचा काळात आणि शेवटच्या आठवड्यात प्रवास करणे टाळावे. जर डॉक्टरांनी आपल्याला या अवस्थेत बेडरेस्ट सांगितली आहे, तर आपण कार चालविणे टाळावे.परंतु जर परिस्थितीच उद्भवली असेल तर  सावधगिरी बाळगावी. जिथे आवश्यक असेल गाडी  थांबवून विश्रांती घ्या.    
 
* कार मध्ये आरामदायक कसे राहावे-  
बऱ्याच काळ एकाच अवस्थेत बसून पाय आणि पाउलांना सूज येते म्हणून लांबचा प्रवास असल्यास थोड्या वेळ विश्रांती घ्या. या अवस्थेत वारंवार लघवी होण्याची समस्या देखील होते. लघवी रोखू नका. लघवी आल्यावर लगेच स्वच्छतागृहात जावे. 
प्रवासामध्ये काही स्नॅक्स जवळ बाळगा.उंच टाचेच्या चपला घालणे टाळा.
 
* सीट बेल्ट लावता येईल का?
प्रवासादरम्यान सीटबेल्ट लावण्याचा सल्ला दिला जातो. आपण गरोदर आहात आणि आपल्याला सीटबेल्ट लावायचे आहे तर सीटबेल्ट सैलसर लावा जेणे करून पोटाला घट्टपणा जाणवू नये. 
 
* गाडी चालवताना काय करावे ?
जर आपले कार्यालय जवळ असेल तर स्वतः गाडी चालवू शकता परंतु  ऑफिस दूर असेल तर या टिप्स ची मदत घ्या. 
 
*ज्यूस आणि पाणी जवळ ठेवा. कोणत्याही परिस्थितीत पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.
* लांबच्या प्रवासात स्वतः ड्रायव्हिंग करणे टाळा. 
* सीटच्या मागे आरामदायक उशी  ठेवा. 
* आपली सर्व औषधे आणि आवश्यक वस्तू कार मध्ये ठेवा.
* लांब सहलीला जाण्यापूर्वी तपासणी करवून डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 
गरोदरपणात गाडी चालवून प्रवास पूर्ण करू शकता.हे गर्भवती महिलांसाठी  सुरक्षित आहे परंतु लांबच्या प्रवासात जाण्यापूर्वी काही तयारी आणि सावधगिरी  बाळगणे आवश्यक आहे. हे आपल्या बाळासाठी आणि आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

प्रेरणादायी कथा : लाल बहादूर शास्त्रींची हृदयस्पर्शी कहाणी

स्वादिष्ट मॅगी कशी बनवावी जाणून घ्या रेसिपी

फक्त मीठच नाही तर या ४ गोष्टी खाल्ल्याने देखील रक्तदाबही वाढू शकतो

International Day of Families Wishes in Marathi जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments