Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माव्याशिवाय बनवा स्वादिष्ट गाजर हलवा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Make delicious carrot stew without mash
, रविवार, 5 डिसेंबर 2021 (16:11 IST)
जर तुम्हाला हिवाळ्यात गरमागरम गाजराचा हलवा खायला मिळत असेल तर यापेक्षा चविष्ट अजून काय असू शकतं. गाजराचा हलवा खाण्यास अतिशय चविष्ट असून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक असतो. तुम्ही घरीही गाजराचा हलवा सहज बनवू शकता. गाजराचा हलवा अनेक प्रकारे बनवला जातो, काही लोक माव्यापासून गाजराचा हलवा बनवतात, तर काही लोक माव्याशिवाय गाजराचा हलवा फक्त दुधाने बनवतात.
तुम्ही बाजारातील माव्यासोबत गाजराचा शिरा खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला माव्याशिवाय गाजराचा शिरा बनवण्याची विधी सांगत आहोत. बाजारातील गाजर हलव्यापेक्षा हा हलवा चवीला चांगला लागतो. रेसिपी जाणून घ्या.
 
गाजर हलव्यासाठी साहित्य
गाजर 1 किलो
दूध फुल क्रीम 1 1/2 लिटर
साखर 250 ग्रॅम
चिरलेले काजू, चिरलेले बदाम, 
मनुका प्रत्येकी 10 
पिस्ता चिरलेला 
वेलची पावडर अर्धा टीस्पून
तूप 1 टेस्पून
 
गारज हलवा रेसिपी
प्रथम गाजर सोलून किसून घ्या.
आता गाजर आणि 1 कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये 1 शिट्टी येईपर्यंत शिजवा.
कुकर उघडल्यावर गाजरातील सर्व पाणी काढून टाकावे.
मध्यम आचेवर कढईत तूप टाकून गरम करायला ठेवा.
आता कढईत तूप गरम करून त्यात गाजराचे मिश्रण शिजवून घ्या.
आता त्यात दूध घालून ढवळत असताना दूध घट्ट होईपर्यंत शिजवा.
सर्व दूध सुकल्यावर गाजरात साखर घालून मिक्स करा.
साखरेचे पाणी सुकल्यावर त्यात वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा.
गाजर, दूध आणि साखरेचे पाणी सुकले की हलवा तयार आहे. 
गरमागरम स्वादिष्ट गाजर हलवा सर्व्ह करा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बोध कथा :शरीर आणि मनावर नियंत्रण नसल्यास ज्ञान देखील विषसमान