अनेकांना गोड खायला आवडते. तसेच गोडाचे पदार्थ तर अनेक आहेत. पण तुम्ही कधी घरी रसमलाई बनवली आहे का? नसेल तर आज आपण पाहणार आहोत अगदी बाजारासारखी रसमलाई घरी कशी बनवावी. तर चला जाणून घ्या रेसिपी.
साहित्य-
दूध एक लिटर
साखर एक कप
लिंबाचा रस दोन चमचे
वेलची पूड
केशर
पिस्ता, बदाम
कृती-
रसमलाई बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईत एक लिटर दूध घेऊन ते उकळवावे. उकळायला लागल्यावर त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालावे. दूध फाटल्यानंतर मलमलच्या कपड्यातून गाळून मिश्रण वेगळे करावे. गाळून घेतल्यानंतर एकदा थंड पाण्याने धुवून घयावे. पाण्याने धुतल्यानंतर थोडे मळून घ्या आणि मऊ करावे. पूर्ण मऊ झाल्यावर त्याचे छोटे गोळे बनवून घ्यावे. आता एका भांड्यात पाणी आणि साखर मिक्स करून पाक तयार करावा.तसेच पाक उकळल्यावर त्यात तयार केलेले गोळे घालावे. तसेच झाकण ठेवून 15 मिनिटे हे गोळे फुगेपर्यंत शिजवून घ्यावे. यानंतर रसमलाईचा रस तयार करण्यासाठी एका पातेल्यात 1 लिटर दूध मंद आचेवर उकळवून घ्यावे. ते घट्ट होईपर्यंत उकळवावे. आता त्यामध्ये साखर, केशर धागे आणि वेलची पूड घालून मिक्स करावे. व 10 मिनिटे शिजवावे नंतर थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यात पाकमध्ये बुडवलेले गोळे घालावे. आता यावर पिस्ता आणि बदाम घालून गार्निश करावे. तर चला तयार आहे आपली रसमलाई रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.