Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अचानक गोड खायची खायची इच्छा झाल्यास बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

Rose Coconut Burfi
अनेकांना अचानक गोड खावेसे वाटते, तर आज आपण अशी एक बर्फी पाहणार आहोत जी झटपट बनेल. खोबऱ्यापासून पासून बनणारी ही बर्फी तुम्हाला नक्कीच आवडेल पण खोबऱ्याची बर्फी तर आपण नेहमीच खातो, पण या वेळी त्याला द्या 'रोझ सिरप'चा शाही ट्विस्ट तर चला जाणून घेऊ या रेसिपी.  
 
साहित्य-
२ कप ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस 
१ कप कंडेन्स्ड मिल्क 
३ चमचे रोझ सिरप किंवा रोझ इमल्शन
२ चमचे तूप
सुक्या गुलाबाच्या पाकळ्या (सजावटीसाठी)
ALSO READ: Watermelon Burfi थंड आणि गोड खायची इच्छा झाली, तर टरबूज बर्फी उत्तम आणि हटके पर्याय
कृती-
सर्वात आधी कढईत तूप गरम करून खोबऱ्याचा कीस २-३ मिनिटे मंद आचेवर हलका परतून घ्या पण रंग बदलू देऊ नका. आता  यात कंडेन्स्ड मिल्क आणि रोझ सिरप घालून मिक्स करा. मिश्रण पॅन सोडू लागेपर्यंत २-४ मिनिटे परता.  तूप लावलेल्या प्लेटमध्ये मिश्रण थापून घ्या, वरून गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि थंड झाल्यावर चौकोनी वड्या कापून घ्या. चला तर तयार आहे झटपट अशी  रोझ कोकोनट बर्फी रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळ्यात बिस्किटे आणि शेव फरसाण नरम पडतात का? या घरगुती उपायांनी कुरकुरीत ठेवा