Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वप्न फळ : स्वप्नांमध्ये हे प्राणी बघितल्याने प्रगती होते

dreams and its meaning
, सोमवार, 4 जानेवारी 2021 (09:14 IST)
स्वप्न जीवनाचा आरसा मानला आहे.स्वप्न शास्त्र पूर्णपणे स्वप्नांवर आधारित आहे. या शास्त्रात स्वप्नांचा अभ्यास केला जातो. स्वप्न शास्त्राला मानणारे म्हणतात की स्वप्नांबद्दल दिले जाणारे युक्तिवाद शास्त्रात योग्य आहेत आणि यांच्या वर विश्वास ठेवला जाऊ शकतो. स्वप्न शास्त्रात स्वप्नात काही प्राणी दिसण्याच्या बाबतीत सांगितले आहे. असे म्हणतात की स्वप्नात काही विशेष प्राणी दिसणे शुभ आहे तर काही अशुभ असतात. अशी मान्यता आहे की स्वप्नात काही विशेष प्राणी दिसणे विशेष योग घडवून आणतात.
 
1 स्वप्नात गाय दिसणे - स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात गाय बघणे खूपच शुभ मानले जाते.असे म्हणतात की स्वप्नात गाय बघितल्याने एखाद्या माणसाचे नशीब उघडते. गायींमध्ये 33 कोटी देवांचा वास आहे. आख्यायिका आहे की गायीला स्वप्नांत बघण्याचा अर्थ आहे की त्या व्यक्तीवर देवाची कृपा झाली आहे आणि त्यामुळे त्या व्यक्ती ला प्रत्येक कामात यश मिळतो आणि त्याच्या प्रगतीचे मार्ग उघडतात.
 
2 हत्ती - हत्ती ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. म्हणतात की स्वप्नात हत्ती बघणे शुभ आहे. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात हत्ती दिसत असेल तर त्याला भरभरून वैभव मिळणार आहे. असे म्हणतात की असं स्वप्नं आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येणार आहे. त्याला सुख- समृद्धी मिळते. हे स्वप्नं बघितल्यावर आई लक्ष्मीला हत्तीची मूर्ती अर्पण करावी.
 
3 घुबड-  घुबडाला स्वप्नात बघणे शुभ मानतात. घुबडाला आई लक्ष्मीचे वाहन मानले जाते. असे म्हणतात की स्वप्नात घुबड बघितल्याने धन-संपत्ती  मिळते.त्या माणसावर लक्ष्मीची कृपा होते. हे स्वप्नं बघितल्यावर आई लक्ष्मीला लाल वस्त्र अर्पण करावे. 
 
4 काळा नाग - स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात काळा नाग दिसल्यास हे शुभ संकेत मानतात.या स्वप्नाचा अर्थ आहे की आपल्या यशात, सन्मानात वाढ होऊन आपली इच्छा पूर्ण होणार आहे.
 
5 ससा- स्वप्नात ससा दिसणे खूपच शुभ मानतात. या स्वप्नाचा अर्थ आहे की जीवनात प्रेम वाढेल. जोडीदारासह नातं दृढ होईल. कार्यक्षेत्रात यश मिळू शकेल.
 
6 पाल - स्वप्नांत पाल दिसणे शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ आहे की आपल्याला अचानक पैसे मिळणार आहे. या शिवाय कर्जासारख्या समस्या पासून मुक्ती मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साप्ताहिक राशीफल 3 ते 9 जानेवारी 2021