साहित्य
अरबी २५० ग्राम
मैदा २५० ग्राम
चणा डाळीचे पीठ ७५० ग्राम
हळद, मीठ, हिंग, ओवापूड, तिखट, मोयन
तळण्यासाठी गोड तेल
कृती
सर्वप्रथम अरबी स्वच्छ पाण्याने धुऊन आणि पुसून घ्या. नंतर कुकर मध्ये ५ शिट्या घेऊन उकडून घ्या. गार झाल्यावर साली काढून त्याला किसून घ्या. परातीत हे मिश्रण एकत्र करून त्यात हळद, हिंग, मीठ, तिखट, मोयन घालून मळून घ्या. यात पाणी मुळीच टाकू नये.
ह्या मिश्रणात डाळीचे पीठ आणि मैदा तो पर्यंत घालायचा जो पर्यंत मिश्रण घट्ट गोळा होत नाही. मिश्रण मुरण्यासाठी १ ते २ तास ठेवा. मुरल्यावर लहान लाट्या करून लाटून घ्या. पापड वाळावून घ्या. वाळल्यावर पापड तळून घ्या. स्वादिष्ट अरबीचे पापड तयार चहासोबत सर्व्ह करा.