Festival Posters
✕

कॉर्न पालक रेसिपी Corn Palak Recipe

Webdunia
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (11:16 IST)
हिरव्या भाज्या पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. हिवाळ्यात हिरव्या भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. अशा स्थितीत मुलांच्या आहारात हिरव्या भाज्यांचाही समावेश करावा, परंतु मुले हिरव्या भाज्या खाण्यास फारच नाखूश असतात. मुलांना पालक खायला देण्यासाठी तुम्ही कॉर्न पालक बनवून खाऊ शकता. पालक आणि कॉर्नपासून बनवलेली ही भाजी अतिशय चविष्ट आणि खायला पोषक आहे. त्यामुळे शरीराला पुरेसे लोह मिळते. पालक आणि स्वीट कॉर्न दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. हि भाजी हिवाळ्यात खूप छान लागते. जाणून घ्या पालक कॉर्नची रेसिपी.
 
कॉर्न पालक साठी साहित्य
1 कप पालक प्युरी
½ कप चिरलेला आणि हलका उकडलेला पालक
1 कप कॉर्न कर्नल
½ चमचा तूप
½ टीस्पून जिरे
2 टीस्पून चिरलेला लसूण
2 चमचे चिरलेली हिरवी मिरची
1 टीस्पून किसलेले आले
चवीनुसार मीठ
2 टीस्पून क्रीम
¼ टीस्पून गरम मसाला
½ टीस्पून लाल तिखट
 
कॉर्न पालक रेसिपी
1. सर्व प्रथम कढईत तूप गरम करा आणि आता त्यात जिरे घाला.
2. आता लसूण, लाल तिखट आणि आले घालून मध्यम आचेवर 1 मिनिट परतून घ्या.
3. पालक प्युरी, पालक, कॉर्न, मीठ, कप पाणी, फ्रेश क्रीम, गरम मसाला आणि लाल तिखट घाला.
4. आता ते चांगले मिसळा आणि ढवळत असताना मध्यम आचेवर 2-3 मिनिटे शिजवा.
5. गरमागरम कॉर्न पालक तयार आहे. रोटी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments