Daily Horoscope
✕

चविष्ट व्हेजिटेबल कटलेट्स रेसिपी

Webdunia
मंगळवार, 17 मे 2022 (09:39 IST)
व्हेजिटेबल कटलेट्स ही एक उत्तम स्नॅक रेसिपी आहे जी तुम्ही नाश्ता म्हणूनही खाऊ शकता. इतकंच नाही तर तुम्ही पार्टीमध्ये स्नॅक म्हणूनही सर्व्ह करू शकता. जर तुमचे मूल शाळेच्या सहलीला जात असेल, तर तुम्ही हे कटलेट्स बनवून त्याच्या टिफिनमध्ये ठेवू शकता.
 
व्हेजिटेबल कटलेटचे साहित्य -120 ग्रॅम (ब्लँच केलेले) फ्रेंच बीन्स, 120 ग्रॅम (सोललेली आणि किसलेली) लौकी, 120 ग्रॅम कोबी, किसलेले 1/2 कप गाजर, 1 कप (उकडलेले आणि मॅश केलेले) बटाटे, 1 टीस्पून जिरे, 2 टीस्पून आले, 2 टीस्पून धणे पूड, आमचूर 1 1/2 टीस्पून मीठ, 2 टीस्पून हिरवी मिरची, बारीक चिरलेली 2 (हलके फेटलेली) अंडी 1/2 कप ब्रेडचे तुकडे, मैदा 1 टेबलस्पून, तेल कोटिंगसाठी.
 
कटलेट कसे बनवायचे
1. बीन्स बारीक चिरून घ्या.
2. दोन चमचे तेल गरम करा, त्यात जिरे आणि आले घाला.
3. हलके हलवा आणि त्यात बीन्स, लौकी, कोबी, गाजर घाला आणि मोठ्या आचेवर परतून घ्या.
4. यात कोथिंबीर आणि आमचूर घाला. मीठ आणि हिरवी मिरची टाका आणि थोडा वेळ ढवळून घ्या.
5. थंड झाल्यावर त्यात बटाटे घाला.
6. त्यापासून गोल किंवा अंडाकृती कटलेट करा.
7. कटलेटवर पीठ शिंपडा, नंतर फेटलेल्या अंड्यात बुडवा. 
8. आता ब्रेड क्रम्बसनी कोट करा.
9.अंड्यात पुन्हा कटलेट बुडवा आणि पुन्हा ब्रेड क्रम्बस लावा.
10.गोल्डन ब्राऊन तळून घ्या आणि सर्व्ह करा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

मासिक पाळी नियमित येत असली तरी PCOS असू शकतो! शरीरातील ही लक्षणे ओळखा आणि वेळीच सावध व्हा

प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी मुलांना शिकवा या सवयी; फटाक्यांशिवायही सण होईल आनंदी!

तेनालीराम कहाणी : शुभ मुहूर्त आणि पहिली टोपली

चांदीचे नाणे खरे की खोटे? हे ओळखण्याची ही युक्ती नक्की वापरून पहा

जगात एकापेक्षा जास्त हृदये असलेल्या प्राण्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

पुढील लेख
Show comments