तसे तर मावा किंवा खवा अनेक प्रकारे तयार केला जातो, जसे की घट्ट, दाणेदार, किंवा मऊ. पण आज आम्ही
येथे आम्ही तुम्हाला मऊ खवा बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. हा प्रयोग करून तुम्ही बाजारासारखा मावा सहज घरी बनवू शकता
खवा तयार करण्याची सोपी पद्दत
घरच्या घरी खवा/मावा बनवायचा असेल तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की यासाठी फुल क्रीम दुध वापरायचे आहे.
आता मावा बनवण्यापूर्वी एक जड तळाचे भांडे घ्या आणि त्यात म्हशीचे मलईचे दूध उकळत ठेवा.
दूध उकळायला लागल्यावर आच मंद करा आणि दर 2-4 मिनिटांनी ढवळत राहा.
दूध घट्ट होऊ लागल्यावर चमच्याने सतत ढवळत राहावे, जेणेकरून दूध जळणार नाही किंवा भांड्याच्या तळाला चिकटणार नाही.
काही वेळात उकळणारा दुधाचा मावा तयार झालेला दिसेल.
जेव्हा दूध घट्ट होऊन त्याचा गोळा तयार होतो तेव्हा समजून घ्या की तुमचा मावा तयार आहे.
आता गॅस बंद करा आणि मावा पूर्णपणे थंड होऊ द्या.
थंड झाल्यावर मावा अजूनच घट्ट होतो.
या प्रकारे तुमचा मावा झटपट तयार झाला आहे. आता तुम्हाला हवं असेल तर याची मिठाई बनवा किंवा आवडीनुसार वापरा.
या व्यतिरिक्त घट्ट खवा तयार करण्यासाठी दुधाला पाचवा भाग राहिल्यार्पंत उकळावे लागतं आणि नंतर एका वाटीत त्याला जमवावे लागते. तर दाणेदार खवा तयार करण्यासाठी दूध उकळताना त्यात लिंबाचा रस घालतात.
टीप: तुम्ही तयार केलेला थंड मावा तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता आणि सुमारे 4-5 दिवस वापरू शकता. तर आता बाजारातून बनावटी मावा खरेदी करणे टाळा आणि घरीच शुद्ध मावा बनवा आणि सणासुदीला मिठाई बनवून कुटुंबातील सदस्यांना खाऊ घाला.