Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलांसाठी बनवा Healthy Tricolor Chaat Recipes

Tri-color Sprouts Chaat
स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी काहीतरी झटपट, चविष्ट आणि मुख्य म्हणजे आरोग्यदायी बनवायचे असेल, तर 'हेल्दी तिरंगा चाट' हा सर्वोत्तम पर्याय आहे! यामध्ये कोणत्याही कृत्रिम रंगाचा किंवा तळलेल्या पदार्थाचा वापर न करता, फक्त नैसर्गिक भाज्या, कडधान्ये आणि फळांचा वापर केला जातो.
 

तिरंगा सप्रॉउट्स चाट 

हा चाट प्रोटीनने भरपूर आणि पचनासाठी अतिशय हलका आहे.
साहित्य-
केशरी थर: उकडलेले लाल चणे / किसलेले गाजर / डाळिंबाचे दाणे
पांढरा थर: उकडलेले पांढरे काबुल चणे (किंवा पनीरचे बारीक तुकडे)
हिरवा थर: मोड आलेली मूग (वाफवलेली) / बारीक चिरलेली काकडी
चाट मसाला: १ छोटा चमचा
शेपू/कोथिंबीर व हिरवी मिरची: बारीक चिरलेली
लिंबाचा रस: १ ते २ चमचे
काळे मीठ व जिरेपूड: चवीनुसार
 
कृती-
सर्वात आधी एका बाऊलमध्ये वाफवलेले हिरवे मूग, काकडी, थोडे काळे मीठ आणि लिंबू रस एकत्र करून हिरवा भाग तयार करा. दुसऱ्या बाऊलमध्ये उकडलेले काबुली चणे/पनीर, जिरेपूड, मीठ एकत्र करून पांढरा भाग तयार करा. तिसऱ्या बाऊलमध्ये किसलेले गाजर, डाळिंब किंवा काबुली चण्यांसोबत चाट मसाला एकत्र करून केशरी भाग तयार करा. एका काचेच्या बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये सर्वात खाली हिरवा थर, मध्ये पांढरा थर आणि वर केशरी थर रचून सुंदर तिरंगी लुक द्या.
 

तिरंगा कॉर्न आणि मखाना चाट

मखानाआणि स्वीट कॉर्नचा वापर करून बनवलेला हा कुरकुरीत आणि पौष्टिक चाट लहान मुलांना खूप आवडतो.
साहित्य-
केशरी रंग: उकडलेले गाजराचे तुकडे आणि बारीक चिरलेला टोमॅटो
पांढरा रंग: भाजलेले मखाने 
हिरवा रंग: उकडलेले हिरवे वाटाणे  किंवा काकडी
मसाले: चाट मसाला, सेंधव मीठ (सेंधा नमक), आणि पुदिना पावडर
 
कृती-
सर्वात आधी मखाने थोडे साजूक तुपावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. प्लेटमध्ये एका बाजूला उकडलेले हिरवे वाटाणे व काकडी (हिरवा थर) ठेवा. मध्ये भाजलेले मखाने (पांढरा थर) ठेवा. दुसऱ्या बाजूला टोमॅटो आणि गाजराचे काप (केशरी थर) ठेवा. वरून चाट मसाला, काळे मीठ आणि लिंबाचा रस भुरभुरा आणि गरमागरम/थंड सर्व्ह करा.
 

तिरंगा पनीर स्टिक चाट

बिन तेलाचा आणि ग्रील केलेला हा चाट दिसायला अतिशय रॉयल दिसतो.
साहित्य-
केशरी: नारंगी/लाल शिमला मिरची आणि टोमॅटो
पांढरा: फ्रेश पनीरचे चौकोनी ठोकळे
हिरवा: हिरवी शिमला मिरची आणि काकडी
टूथपिक किंवा लाकडी स्टिक्स 
 
कृती-
सर्वात आधी टूथपिक किंवा स्टिकमध्ये आधी हिरवी शिमला मिरची, मग पनीरचा चौकोनी तुकडा आणि शेवटी लाल/केशरी टोमॅटो किंवा शिमला मिरची टाका. या स्टिक्सवर थोडा चाट मसाला, काळे मीठ आणि लिंबू रस टाका. तुम्ही हवे असल्यास या स्टिक्स नॉन-स्टिक तव्यावर १ मिनिट हलक्या शेकून घेऊ शकता.
 
टिप्स : 
या चाटमध्ये शेव, पापडी किंवा तळलेले पदार्थ वापरणे टाळा.
गोड चटणीऐवजी खजूर-गुळाची चटणी किंवा फक्त लिंबाचा रस व चाट मसाला वापरा, ज्यामुळे उष्मांक कमी राहतील आणि पोषण पूर्ण मिळेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pocketing Relationship: नक्की काय आहे 'पॉकेटिंग' हा रिलेशनशिप ट्रेंड आणि त्याची ४ प्रमुख लक्षणे