Marathi Biodata Maker

डिनरसाठी नक्की ट्राय करा कोफ्ता पुलाव

Webdunia
शुक्रवार, 23 जानेवारी 2026 (17:18 IST)
रोज रात्री काय बनवावे हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. तसेच कधी कधी तर काहीच सुचत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला लज्जतदार अशी रेसिपी सांगणार आहोत. जी चवीला तर स्वादिष्ट आहे तसेच बनवायला देखील सोप्पी आहे. तर चला जाणून घेऊन कोफ्ता पुलाव कसा बनवावा. तर चला लिहून घ्या रेसिपी.
 
कोफ्ता बनवण्यासाठी 
साहित्य-
1 कप किसलेले पनीर 
1/2 कप उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे
1 चमचा तूप
1/4 कप बारीक चिरलेला कांदा
1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
1 चमचा जिरे
1 चमचा गरम मसाला
1/2 चमचा हळद  
1/2 चमचा लाल तिखट 
चवीनुसार मीठ
 
पुलाव बनवण्यासाठी:
साहित्य-
2 कप बासमती तांदूळ
1 मोठा कांदा
1 तमालपत्र
3 लवंगा
3 हिरव्या वेलची
1 दालचिनी
1 चमचा जिरे
1 चमचा गरम मसाला
चवीनुसार मीठ
4 कप पाणी
ALSO READ: स्वादिष्ट कॉर्न पुलाव रेसिपी
कृती-
एका बाऊलमध्ये किसलेले पनीर, मॅश केलेले बटाटे, कांदा, धणे, जिरे, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ एकत्रित करावे. हे सर्व मिक्स केल्यानंतर मध्यम गोळे बनवा. आता नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात गोळे तळून घ्या. यानंतर एका मोठ्या भांड्यात थोडे तूप गरम करावे. व त्यामध्ये तमालपत्र, लवंगा, वेलची, दालचिनी आणि जिरे टाकून तडतडू द्या. त्यात कांदा घालावा. भिजवलेले तांदूळ गाळून भांड्यात टाकावे. तसेच तांदूळ मसाल्यांचा सुगंध शोषून घेण्यासाठी परतवून घ्यावा. आता भातामध्ये पाणी, मीठ आणि गरम मसाला घाला. तसेच उकळी येऊ द्या. मग झाकण ठेवून शिजवावे. शिजवलेल्या पुलावात कोफ्ते घालून मिक्स करा. आणखी 3 मिनिटे मंद गॅसवर शिजवा. तर चला आपला कोफ्ता पुलाव तयार आहे. लोणच्यासोबत देखील सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: डिनरमध्ये बनवा स्वादिष्ट असा काजू-किशमिश पुलाव पाककृती
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

Mixed Vegetable Paratha चविष्ट आणि पौष्टिक मिक्स व्हेज पराठा रेसिपी

पावसाळ्यात दही खाण्यात काही नुकसान आहे का? सत्य जाणून घ्या

Career in Logistic Management after 12th : लॉजिस्टिक मॅनेजमेंटमध्ये करा करिअर

पावसाळ्यात केस जास्त का गळतात? याची कारणे आणि त्यावरचे घरगुती उपाय जाणून घ्या

Monsoon Health Tips: पावसाळ्यात आजारपणाच्या धोक्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे

पुढील लेख
Show comments