Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कांदा-लसूण शिवाय बनवा बटाट्याची रसदार भाजी

batata bhaji
, शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
बटाटे - पाच चिरलेले
टोमॅटो - दोन चिरलेले 
हिरवी मिरची - दोन चिरलेली 
कोथिंबीर - अर्धा कप चिरली 
जिरे - 1 चमचा 
हिंग - चिमूटभर
हळद -अर्धा चमचा 
धणे पूड - अर्धा चमचा  
तिखट 
गरम मसाला 
चवीनुसार मीठ 
तेल 
 
कृती-
एका पॅनमध्ये तेल घालून जिरे आणि हिंग घालावे. मग त्यामध्ये हिरवी मिरची घालावी. आता टोमॅटो घालावे व परतवून घ्यावे त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. आता पॅनमध्ये टोमॅटोची ही प्युरी घालावी व वरतून हळद, तिखट, धणे पूड, मीठ घालावे व परतवून घ्यावी त्यानंतर यामध्ये बटाटे घालावे व मिक्स करावे आता झाकण ठेऊन वाफ येऊ द्यावी. तसेच भाजी शिजल्यानंतर त्यावरून कोथिंबीर घालावी तर चला तयार आहे आपली कांदा लसूण न वापरता रसदार बटाटा भाजी, गरम पोळी किंवा पराठा सोबत सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संबंध ठेवल्यानंतर झोपल्याने गर्भधारणा होते का? जाणून घ्या pregnancy संबंधित प्रश्नांची उत्तरे