साहित्य : 1 वाटी तूरडाळ, 1 कांदा बारीक चिरून, 4 ते 5 लाल मिरच्या, 4 ते 5 कडीपत्ता पाने बारीक चिरून, 1 इंच आलचा तुकडा खिसून, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ, तेल तळण्यासाठी.
कृती : प्रथम तूरडाळ निवडून धुवून घ्यावी. नंतर किमान दोन तास पाण्यात भिजत ठेवावी. मिक्सर जारमध्ये त्याची पेस्टबनवून घ्यावी. नंतर जारमध्ये निथळलेली तूरडाळ घालावी. त्यातच लाल मिरचीची पेस्ट घालून मिश्रण भज्याच्या पिठाप्रमाणे बनवून घ्यावे. आता तयार पीठ बाऊलमध्ये काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, आले, हिंग आणि मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. आता गॅसच्या मध्यम आचेवर कढईत तेल गरम करावे. भजाचे पीठ परत एकदा मिक्स करावे. आच मंद करून भज्याचे पीठ गरम तेलात सोडावे. भजी हलक्या सोनेरी रंगावर आणि कुरकुरीत झाली तयार गरम तूरडाळ पकोडा चटणी अथवा सॉस सोबत सर्व्ह करा .