Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आई हवीच, सखे आई हवीच

Webdunia
मंगळवार, 25 एप्रिल 2023 (12:52 IST)
ऊन ऊन मऊ भाताचे चार घास,
काऊचिऊच्या गोष्टी सांगत भरवायला,
आई हवीच..
 
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर,
यशापयशात नी सुखदुःखातही,
आई हवीच..
 
वाढदिवसाच्या वा निकालाच्या दिवशी,
आवडीचे गोडधोड करून आपली वाट पाहणारी,
आई हवीच..
 
कौतुकासोबतच शिस्त लागावी म्हणून,
आठवणीने पाठीत चार रट्टे देणारी,
आई हवीच..
 
ऐन सोळाव्या वर्षातलं गोड गुलाबी गुपित,
हळूच कानात सांगायला,
आई हवीच..
 
मुलीच्या लग्नकार्याची काळजी आत दाबून,
हसत सर्वाला सामोरी जाणारी,
आई हवीच..
 
लग्नाच्या आदल्या रात्री,
कुशीत शिरून मनसोक्त रडायला,
आई हवीच..
 
लग्नानंतरचा सासरी आलेला राग,
हक्काने कोणावर तरी काढायला,
आई हवीच..
 
नवर्‍याशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर,
'आपणंच जरा समजुतीने घ्यावं गं' हे सांगायला,
आई हवीच..
 
पहिल्यावहिल्या बाळंतपणाची,
हौस पुरवायला व धीर द्यायला,
आई हवीच..
 
आईपण निभावता निभावता थकल्यावर,
विसाव्याचे हक्काचे ठिकाण अशी,
आई हवीच..
 
ऐन पन्नाशीत 'आता थकले बाई' असं म्हणताच,
ऐशी वर्षाची मी अजुन ठणठणीत आहे,
तुला काय धाडं भरल्ये असं म्हणायला,
आई हवीच..
 
वडील सासुसासरे नणंद नवरा नातेवाईक व मित्रमैत्रिणी,
कितीही प्रेमळ असले तरी आईची जागा भरून काढायला,
आई हवीच..
 
थोडक्यात काय..
आयुष्यात वेगवेगळ्या भूमिकांतून जाताना,
मुलीच्या पाठी खंबीरपणे उभी,
अशी तिची आई हवीच..
 
आई हवीच गं सखे,
आई हवीच..
 
- साभार सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Earth Day 2025 Speech जागतिक वसुंधरा दिन भाषण

उन्हाळ्यात स्वादिष्ट दही भाताचा घ्या आस्वाद

तीखट-मीठ लावलेली कैरी खाण्याचे हानिकारक प्रभाव जाणून घ्या

World Earth Day Essay 2025 in Marathi जागतिक वसुंधरा दिन निबंध मराठीत

बॅचलर ऑफ बिझनेस अॅनालिटिक्स मध्ये करिअर

पुढील लेख
Show comments